इलॉन मस्कही PM मोदींचे फॅन! पंतप्रधानाच्या भेटीनंतर म्हणाले, 'भारताच्या भविष्याबद्दल…'

टेस्लाचा आणि ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली आहे. इलॉन मस्क आणि नरेंद्र मोदींच्या भेटीमध्ये भारतात गुंतवणूक करण्याविषयी चर्चा झाल्याची माहीती आहे. टेस्लाचा उद्योग भारतात कुठे उभारणार, यावर वर्षाअखेरीस अंतिम निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया मस्क यांनी दिली आहे.

तर मोदी हीरो आहेत, त्यांना भारत देशासाठी खूप काही करायचं आहे, त्यांच्याशी अतिशय व्यापक चर्चा झाली, असंही इलॉन मस्क यांनी म्हंटलं आहे. तसेच मी पंतप्रधानांचा फॅन असल्याचं मस्क यांनी यावेळी म्हंटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेत. पंतप्रधान मोदी काही दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काल (मंगळवारी) पंतप्रधानांनी ट्विटर सीईओ इलॉन मस्क यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. पुढील वर्षी मस्क भारत दौऱ्यावर येणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर माहिती देताना मस्क इलॉन म्हणाले की, पंतप्रधान मोदींशी चांगली भेट होती. यावेळी आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा केली. पुढील वर्षी मी भारतात येण्याचा विचार करत आहेत. पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या देशाची खूप काळजी आहे. म्हणूनच ते भारतात गुंतवणुकीसाठी खूप सक्रिय आहेत. आम्ही देखील भारतात गुंतवणुकीच्या संधी शोधत आहोत. आम्ही योग्य वेळेची वाट पाहत आहोत. तसेच मोदींना ब्रॉडबँड इंटरनेट सेवा स्टारलिंक भारतात आणायची आहे. या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत इंटरनेटची सुविधा पोहचण्यास मदत होणार आहे असंही इलॉन मस्क यांनी म्हंटलं आहे.

मस्क यांनी मोदींचे कौतुक करताना म्हंटलं कि, भारताच्या भविष्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. मोदींना त्यांच्या देशाबद्दल खूप प्रेम आणि काळजी आहे. म्हणूनच ते आम्हाला भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने