भारतीय टपाल विभागातील १२८२८ पदांच्या भरतीसाठी अर्जाची मुदत वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

India Post GDS Recruitment 2023 : भारतीय टपाल विभागात भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय पोस्ट मेघालय, सिक्कीम, त्रिपुरा आणि मणिपूरसाठी ग्रामीण टपाल सेवक (GDS) (शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा टपाल मास्टर (ABPM)/टपाल सेवक) या पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी पुन्हा सुरू करेल. अधिकृत माहितीनुसार, १६ जूनपासून नोंदणी लिंक सक्रिय होईल. यासाठी उमेदवार २३ जूनपर्यंत अर्ज करू शकतात, ही शेवटची तारीख आहे. एकदा ही लिंक सक्रिय झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइट, indiapostgdsonline.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. संस्थेतील १२८२८ पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.
करेक्शन विंडो कधी उघडेल?

२४ जून ते २६ जून या कालावधीत उमेदवारांना त्यांचे अर्ज फेरफार विंडोद्वारे संपादित करता येतील. ज्या उमेदवारांनी ११ जूनपर्यंत अर्ज सादर केले आहेत ते २४ जून ते २६ जूनपर्यंत त्यांचे अर्ज संपादित(एडीट) करू शकतात या भरतीसाठी पहिले अर्ज ११ जून रोजी बंद झाले होते, त्यानंतर ते १६ जूनपासून पुन्हा उघडले जातील. उमेदवार खाली दिलेल्या सुचनांचे पालन करून अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा
भारतीय टपाल विभाग भरती 2023 साठी वयोमर्यादा ११ जून २०२३ रोजी उमेदवाराचे १८-४० वर्षांपर्यत असले पाहिजे. सरकारी नियमांनुसार SC/ST/OBC उमेदवारांसाठी वयात सवलत दिली जाईल.

अर्ज फी
भारतीय टपाल विभागाच्या या भरतीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. पण, सर्व महिला अर्जदार, SC/ST अर्जदार, PWD अर्जदार आणि ट्रान्सवुमन अर्जदारांना फी भरण्यात सूट आहे.

अधिकृत अधिसुचना – https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Model_Notification.pdf


अंतिम मुदतीमध्ये वाढ अधिसुचना – https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Addendum.pdf

शाखेनुसार पोस्ट अधिसुचना – https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Final_Post_Consolidation.pdf

अर्ज कसा करावा

  • सर्व प्रथम उमेदवारांच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • त्यानंतर उमेदवारांची नोंदणी करा आणि नंतर अर्ज भरा.

  • नंतर विनंती केलेली माहिती भरा आणि अर्ज शुल्क भरा.

  • अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्ज जमा करा.

  • शेवटी, उमेदवारांच्या अर्जाची प्रत प्रिंट करून ठेवा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने