महाबळेश्वरमध्ये स्थायिक झालेली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री घराशेजारीच करते शेती, शेअर केलेला फोटो चर्चेत

महाबळेश्वर :मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. बहिण गौतमी देशपांडेबरोबरचे मजेशीर व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. चाहत्यांचं सतत मनोरंजन करणारी ही अभिनेत्री सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. निसर्गाच्या सानिध्यात छोटसं घर बांधलं असल्याचं मृण्मयीने मध्यंतरी एक पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. सध्या मृण्मयी पतीसह महाबळेश्वरमध्ये स्थायिक झाली आहे.

मृण्मयीच्या हाती सध्या काही चित्रपट आहेत. चित्रीकरण सांभाळत तिने एक नवा व्यवसायही सुरू केला आहे. मृण्मयीने स्वतःचा एक नैसर्गिक ब्युटी ब्रँड सुरु केला आहे. महाबळेश्वरमधूनच ती या संपूर्ण ब्रँडच काम पाहते. सोशल मीडियाद्वारे काम करतानाचे विविध फोटो व व्हिडीओ ती शेअर करतानाही दिसते. शहरातलं घर सोडून ती आता निसर्गाच्या सानिध्यात राहत आहे.इतकंच नव्हे तर मृण्मयी घराभोवती असलेल्या परिसरामध्ये शेतीही करते. याबाबतच तिने आता एक फोटो शेअर केला आहे. तिच्या शेतामधील फ्रेश भाज्यांचा फोटो तिने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला. या फोटोमध्ये वांगी, भेंडी. मिरची, कोथिंबीर दिसत आहे. इतकंच नव्हे तर फ्रेश भाजी मिळाल्याचा आनंद मृण्मयीच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

मृण्मयीची ही पोस्ट पाहता चाहत्यांनीही तिचं कौतुक केलं आहे. याआधी मृण्मयी पुण्यामध्ये राहत होती. मृण्मयी व तिच्या पतीने महाबळेश्वरमध्ये आणखी एक नवं काम सुरु केलं आहे. दोघंही तीन दिवसांचं शेतीचं प्रशिक्षण देतात. मध्यंतरी तिने फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. तिच्या या शेती प्रशिक्षणाला अनेकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने