“सात्विक सौंदर्य स्वर्गात परतलं!” सुलोचना दीदींच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून सुलोचना दीदी श्वसनाशी संबंधित संसर्गानं आजारी होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुलोचना दीदींच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकरांनी शोक व्यक्त केला आहे.




अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने वाहिली श्रद्धांजली


सुलोचना दीदींच्या निधनानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्रीने ट्वीट करत लिहलं आहे. “सात्विक सौंदर्य स्वर्गात परतलं…ओम शांति”


अभिनेता रितेश देशमुखनेही सुलोचना दीदींच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त केला आहे. रितेशने ट्वीटमध्ये लिहिंल आहे “सुलोचना दिदी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठीसह हिंदी चित्रसृष्टीतील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महान अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.”

मराठी अभिनेत्री रुपाली भोसले वाहिली श्रद्धांजली

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रुपाली भोसलेने सुलोचना दीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. रुपालीने सुलोचना दीदींचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


सुलोचना दीदींनी मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही केलेलं काम उल्लेखनीय आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांबरोबर त्यांनी रुपेरी पडद्यावर महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील बाबुराव पेंटर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुलोचना दीदींचा जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला होता. सूर्यकांत, चंद्रकांत यांच्यासमवेत त्यांनी कोल्हापुरात ‘मोलकरीण’, ‘वहिनींच्या बांगड्या’, ‘मिठभाकर’, ‘धाकटी जाऊ’ असे चित्रपट केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने