Hydrogen Fuel असेल भविष्याचं इंधन, काय आहेत हायड्रोजन फ्यूएलचे फायदे तोटे?

गेल्या काही वर्षांमध्ये इंधनांचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिसेलच्या गंगनचुंबी किमतींमुळे वाहन मालकांसोबत ऑटोमोबाईल क्षेत्राला देखील समस्यांचा सामना करावा लागतोय. तसंच सीएनजीच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येते आहे.

यासाठीच अलिकडे अनेक ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांच्या सोयीसाठी वेगवेगळे पर्याय आणत आहे. यात सध्या इलेक्ट्रीक कार, हायब्रीड हे पर्याय आहेत. त्यात आता भर पडलीय ती म्हणजे हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची.

हायड्रोजन फ्यूएल हा सध्या इंधनाचा सर्वात नवा पर्याय आहे. भविष्यामध्ये हायड्रोजन फ्लूएवर चालणाऱ्या गाड्या बाजारात येवू लागल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. कारण सध्या या इंधनावर भर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता अनेकांना हायड्रोजन फ्यूएल म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल. तर यासाठीच आम्ही तुम्हाला हायड्रोजन फ्लूएल नेमकं काय आहे आणि त्याचे फायदे तोटे सांगणार आहोत.
काय आहे हायड्रोजन फ्लूएल?

हायड्रोजन फ्यूएल हा एक क्लिन म्हणजे स्वच्छ इंधनाचा पर्याय आहे. या इंधनाची निर्मिती पाण्यापासून तयार केली जाते. फ्यूएल सेलमध्ये याच्या वापरानंतर धूर किंवा कार्बन एवजी पाण्याची निर्मिती होते. त्यामुळे इंधनाचा हा नवा पर्याय सीएनजीपेक्षा अधिक उत्तम समजला जातो. यामुळे कोणतंही प्रदूषण होत नाही.

इलेक्ट्रोलायझरच्या साहाय्याने पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करता येतो. यासाठी लागणारं तंत्रज्ञान हे अगदी सोप असल्याने ते सहज तयार केलं जाऊ शकतं. हे एक असं इंधन आहे ज्याचा उपयोग वीज निर्मिती करण्यासाठी केला जाऊ शकतो.

इतर इंधनाच्या तुलनेत किती फायदेशीर?

हायड्रोजन फ्यूएल हे इतर इंधनांच्या तुलनेत सगळ्यात उत्तम पर्याय ठरू शकते. अर्थात यासाठी पुरेसं इंफ्रास्ट्रक्चर म्हणजेच पायाभूत सुविधा असणं गरजेचं आहे. भारतात सध्याच्या घडीला अशा सुविधा उपलब्ध नाहीत. याशिवाय हायड्रोजन फ्लूएल सेलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती देखील भारतात सध्या होत नाही.

सध्याच्या घडीला तरी भारतामध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांवर भर दिला जात आहे. मात्र केंद्र सरकारने नुकतीच हायड्रोजन फ्लूएलच्या वापराचं महत्व ओळखून त्यावर अधिक संशोधन सुरू केलं आहे.

हायड्रोजन फ्यूएलचे फायदे

हायड्रोजन फ्यूएलच्या वापरामुळे प्रदूषण नियंत्रणात आणणं शक्य आहे.

हायड्रोनजन फ्यूएलवर चालणाऱं वाहन हे इलेक्ट्रीक कार सारखचं असेल.

डिझेल आणि पेट्रोलप्रमाणेच हायड्रोजन फ्यूएल भरणं अत्यंत सोपं असेल. तसंच हे इंधन इलेक्ट्रिक कार प्रमाणेच कमी RPM वर जबरदस्त टॉर्क प्रदान करण्यास सक्षम आहे.

हायड्रोजन इंधनाच्या वापरामुळे कोणतही वायू प्रदूषण होत नाही तसचं कार्बन डायऑक्साइडसारख्या कोणत्याही वायुचं उत्सर्जन होत नाही.

हायड्रोजन इंधन पाण्याच्या मदतीने तयार होत असल्याने ते मोठ्या प्रमाणात तयार केलं जाऊ शकतं. डिझल-पेट्रोलप्रमाणे त्याचे स्त्रोत मर्यादित नाही.

हायड्रोजन फ्यूएलचे तोटे

हायड्रोजन ज्वलनशील गॅस असल्याने वाहनांमध्ये त्याचा वापर करणं काही प्रमाणात धोकादायक ठरू शकतं.

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत हायड्रोजन इंधन साठवणं जास्त कठिण आहे.

हायड्रोजन फ्यूएलवर चालणाऱ्या गाड्यांची रिपेअरिंग आणि रनिंग कॉस्ट ही जास्त असू शकते.

हायड्रोजन गॅस निर्मितीसाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असते.

अशा प्रकारे हायड्रोजन गॅसचे जसे काही फायदे आहेत तसते तोटे देखील आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने