स्कूल चले हम! लॅपटॉपपासून प्रिंटर आणि इतर प्रोडक्ट्सवर दमदार डिस्काउंट, पाहा टॉप ५ डिल्स

आजकाल तंत्रज्ञान जगतात नवनवीन शोध लागत आहेत. टेक्नोलॉजी खूप डेव्हलप झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासही आधुनिक झाला आहे. जर तुम्हाला मुलांचे शिक्षण सुधारायचे असेल तर तुम्हाला तसे गॅजेट्स त्यांना द्यावे लागतात. आता लवकरच शाळा पुन्हा सुरु होणार असून याच पार्श्वभूमीवर अॅमेझॉनने खास ​Amazon Back To School Sale सुरु केला आहे. या सेलमध्ये स्टेशनरीपासून ते अगदी प्रिटंर, लॅपटॉप अशा विविध शाळेसंबधी गोष्टींवर शानदर डिस्काउंट दिलं जात आहे.तुम्ही यामध्ये स्मार्टवॉच, प्रिंटर, लॅपटॉपसारख्या गोष्टी खरेदी करु शकता. या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय तसेच एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.या खास डीलमध्ये तुम्हाला प्रचंड सवलत आणि अनेक उत्तम ऑफर्सही मिळत आहेत. तुम्ही या सेलमध्ये बचतीसह अनेक वस्तू आणि गॅझेट्स घेऊ शकता. चलातर या सेलमधील खास डिल्स पाहूया…IMOO Watch Phone Z1 Kids Smart Watch (किंमत ९९८९ रुपये)

लहान मुलांसाठी हे एक उत्तम स्मार्टवॉच आहे. हे 4G सपोर्टेड स्मार्टवॉच दिसायलाही खूप छान आहे. या स्मार्टवॉचची बॅटरीही दीर्घकाळ टिकणारी आणि टिकाऊ आहे. IPX8 जलरोधक, 2MP कॅमेरा असे खास फीचर्स असणाऱ्या या स्मार्टवॉचवरून तुम्ही व्हिडिओ आणि फोन कॉल्स देखील अटेंड करू शकता. या घड्याळात जीपीएस देखील देण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्ही मुलांचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करू शकता.

HP 14s, 11th Gen Intel Core i3-1115G4 FHD Laptop (किंमत- ५९,९९० रुपये)

स्लिम आणि स्लीक डिझाईन असलेला हा लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये 14 इंच स्क्रीन असून इनबिल्ट अलेक्सासह येपतो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आवाजाने लॅपटॉप नियंत्रित करू शकता. फास्ट बॅटरी चार्जिंग तसेच दीर्घकाळ टिकणारी बॅटरी या लॅपटॉपला दिली आहे. अभ्यासाबरोबरच कामासाठीही हा एक उत्तम लॅपटॉप ठरू शकतो. या लॅपटॉपमध्ये अँटी ग्लेअर फुल एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. त्याचे वजनही खूप कमी आहे.

Oppo Pad Air 4GB RAM 64GB ROM (किंमत- १५,९९९ रुपये)

हा देखील मार्केटमधील एक बेस्ट टॅब्लेट आहे. या टॅबमध्ये १०.३६ इंच मोठ्या आकाराची स्क्रीन उपलब्ध आहे. हा एक स्लिम असा टॅब्लेट आहे.

यात आयपीएस पॅनेल दिवं असून या टॅब्लेटचा स्टेरिओ क्वॉड स्पीकर अतिशय दमदार असा आहे, ज्यामुळे तुम्ही उत्तम मनोरंजनाचा आनंदही घेऊ शकता.

Canon PIXMA E4570 All in One (Print, Scan, Copy) (किंमत ८,५९९ रुपये)

हा देखील एक टॉप रेटेड आणि मार्केटमधील बेस्ट प्रिंटर आहे. याच्या मदतीने तुम्ही प्रिंट, स्कॅन आणि कॉपी अशी सारी कामं करू शकता. यात फॅक्स आणि ऑटो डुप्लेक्सची सुविधाही आहे. हा इंकजेट प्रिंटिंग तंत्रज्ञानावर चालणारा प्रिंटर आहे. हा प्रिंटर घराबरोबरच ऑफिससाठीही योग्य आहे. विद्यार्थीही याचा सहज वापर करू शकतात. हा जवळजवळ सर्व उपकरणांशी कनेक्ट होऊ शकते.

Cello Bling Pastel Ball Pen | Blue Ball Pen (किंमत १२८ रुपये)

या यादीत हे एक कॉम्बो पेन जार देखील आहे. हा पेन जार विद्यार्थ्यांसाठी अगदी बेस्ट मानला जात आहे. कारण या जारमध्ये तुम्हाला एकूण 25 युनिट पेन दिले जात आहेत. हा पेन बराच काळ चाल असून स्पष्ट आणि गुळगुळीत लेखनासाठी बेस्ट आहे. हा शाळेसोबत हे ऑफिससाठीही उत्तम ठरू शकते.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने