Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेचे बिगुल वाजले; सूर्याच्या किरणांनी ज्योत प्रज्वलित

कोरोनाच्या व्यत्ययामुळे आशियाई खंडातील प्रतिष्ठेची समजली जाणारी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ ऐवजी २०२३ मध्ये ढकलण्यात आली. आता ही क्रीडा स्पर्धा या वर्षी २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या दरम्यान चीनमधील हांगझू येथे खेळवण्यात येणार आहे. याप्रसंगी चीनकडून १०० दिवसांचे काऊंटडाऊन सुरू करण्यात आले असून याच पार्श्वभूमीवर लियांगझू या प्राचीन शहरात सूर्याच्या किरणांचा वापर करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली.आशियाई क्रीडा स्पर्धेचा श्रीगणेशा मोठ्या दिमाखात करण्यात आला. सूर्याच्या किरणांचा वापर करून अवतल आरशातून ज्योत पेटवण्यात आलीय. त्यानंतर ती मशाल चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या झेजियांग प्रांतीय समितीचे सचिव यी लियानहोंग यांच्याकडे दिली. याप्रसंगी एक डिजिटल मशाल रिले ऑनलाईन सुरू करण्यात आली.
चीनमधील हांगझू हे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. ५६ ठिकाणी क्रीडा शर्यती होणार आहेत. यामध्ये १२ ठिकाणे नव्याने बांधण्यात आली आहेत. ४४ ठिकाणांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या मानाच्या समजल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये ४० खेळांच्या ४८२ शर्यती होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने