पुरूषहो, डोक्यापासून पायापर्यंत सर्व बंद नसा खोलतात ही 5 फळे, हार्ट फेल ते लैंगिक समस्या कोणताच आजार होत नाही

स्त्रियांपेक्षा पुरूष हे आपल्या आरोग्याबद्दल खूप निष्काळजी असतात. ते त्यांच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. अर्थात ते मुद्दाम हा निष्काळजीपणा करतात असेही नाही. सततची धावपळ आणि जबाबदाऱ्या यांच्यामध्ये त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्षच द्यायला मिळत नाही आणि यामुळे कित्येक रोग त्यांच्या शरीराला जडतात. पुरूषांमध्ये सर्वाधिक दिसणारा आजार म्हणजे High Blood Pressure अर्थात उच्च रक्तदाब होय. त्यामुळे Heart Attack आणि Heart Stroke सुद्धा येऊ शकतो.

पुरूषांनी अधिकाधिक फळे खाल्ली पाहिजेत जेणेकरून ते सुदृढ राहू शकतात. जर तुम्ही पुरुष असाल आणि तुम्हाला अगदी फिट आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर यासाठी 5 फळे खाणे आवश्यक आहे. जे आवश्यक पोषण पुरवण्यासोबतच शरीरातील रक्ताभिसरण देखील वाढवतात. यामुळे पुरूषांची हरत-हेची शक्ती वाढते आणि त्यांचे शरीर 5 घातक आजारांपासून दूर राहते.हे आहेत ते पुरूषांसाठी घातक आजार

  1. हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोक

  2. हृदय निकामी होणे

  3. किडनी निकामी होणे

  4. नसा डॅमेज होणे

  5. लैंगिक समस्या

डाळींब

डाळिंबात पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट्स आणि नायट्रेट्स असतात. हे खाल्ल्याने रक्त प्रवाह वाढतो आणि स्नायूंच्या ऊती अर्थात मसल्स टिश्यू हेल्दी होतात. वर्कआऊटच्या ३० मिनिटे आधी डाळिंबाचा रस प्यायल्याने मसल्सना आराम मिळतो असे अनेक संशोधनातून दिसून आले आहे.

बीट

डाळिंबाप्रमाणेच बीटरूटमध्येही अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यात नायट्रिक ऑक्साईड देखील असते, जे नसा रिलॅक्स करून बल्ड सर्क्युलेशन वेगवान करते.

आंबट फळे

संत्री, द्राक्षे यांसारख्या आंबट आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. ज्यामुळे नसांचे इंफ्लामेशन कमी होते. याशिवाय हे घटक रक्तप्रवाह वेगवान वाहण्यास मदत करतात आणि हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात आणि ज्याचा पुरूषांना फायदा होतो.

कलिंगड आणि द्राक्षे

कलिंगडाच्या आत एक घटक असतो, जो नसांना रुंद करतो आणि ब्लड सर्क्युलेशन अधिक गतिमान करतो. त्याचप्रमाणे, द्राक्षांमध्ये प्लेटलेट्सला मदत करणारे गुणधर्म असतात जे रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ देत नाहीत आणि रक्त जलद गतीने वाहते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने