ऑफिस बाहेर जखमी पक्षी पाहिला, मदत करण्यासाठी टोल फ्री नंबवर कॉल केला आणि बसला झटका

मुंबई: जखमी पक्ष्याची मदत करणे मुंबईतील एका व्यक्तीला महागात पडला. संबंधित व्यक्तीच्या कार्यालयाबाहेर एक पक्षी जखमी अवस्थेत दिसला. त्याला मदत करण्यासाठी म्हणून केलेल्या प्रयत्नात बँक खात्यातून एक लाख रुपयांचा फटका बसला.
ध्वनी मेहता (वय-३०) हे महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. १७ मे रोजी त्यांना ऑफिसच्या बाहेर एक पक्षी दिसला जो जखमी अवस्थेत होता. पक्षाच्या मदतीसाठी ते एका संस्थेचा शोध घेत होते. यासाठी त्यांनी गुगलवर सर्च केले आणि मेहता यांना एक टोल फ्री नंबर मिळाला. या नंबरवर फोन करून त्यांनी माहिती घेतली. फोनवरील संबंधित व्यक्तीने त्याने वैयक्तीक माहिती विचारली आणि एक लिंक पाठवली. एका मिनिटाच्या आत त्यांना आणखी एका व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने त्यांनी लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. क्लिक केलेल्या लिंकवरून एक नवे पेज ओपन झाले. संबंधित व्यक्तीने मेहता यांना त्यात सर्व तपशील भरण्यास सांगितले. त्यानंतर नोंदणी फी म्हणून १ रुपये देण्यास सांगितले.


मेहता यांना फोनवरील व्यक्तीने आणखी एक पेज ओपन करण्यास सांगितले आणि त्यात त्यांनी गुगल पे द्वारे पैसे देण्याचा पर्याय होता. मेहता यांनी युपीआय पिन टाकून पैसे दिले. तेवढ्यात त्यांना Payzappची नोंदणी सुरू झाल्याचा मेसेज आला. पाठोपाठ पक्षी संरक्षण पथकाकडून मेसेज आला.
या सर्व गोष्टी झाल्यानंतर Payzappवर नवीन लॉगइन झाल्याचा मेसेज आला. थोड्यावेळात एका व्यक्तीचा फोन आला ज्याने त्यांना सांगितले की, जखमी पक्ष्याला घेण्यासाठी त्यांचे पथक निघाले आहे ते थोड्याच वेळात पोहोचतील. पण एक तास झाला तरी कोणी आले नाही. या घटनेनंतर काही तासांनी मेहता यांना ९९ हजार ९८८ रुपये बँक खात्यातून वगळण्यात आल्याचा मेसेज आला.
हा मेसेज पाहून मेहता यांना शॉक बसला. कारण त्यांनी पिन शेअर केला नव्हता. तरी देखील जवळ जवळ १ लाख रुपये बँक खात्यातून वगळण्यात आले होते. दुसऱ्याच दिवशी त्यांनी या घटनेची तक्रार एन एम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी या संदर्भात तक्रार दाखल करून घेतली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने