नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या ही आजकाल अशी दोन नावे आहेत, जी कोट्यवधी लोकांच्या हृदयावर आणि मनावर अधिराज्य गाजवत आहेत. धोनीने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे नेतृत्व करत त्यांना पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) २०२३ चं विजेतेपद पटकावून दिलं. तर हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स (GT) चं नेतृत्व सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये नेलं. दरम्यान या दोन्ही स्टार क्रिकेटर्सचे कौतुक सर्व स्तरातून होत असून क्रिकेटशिवाय हे दोन्ही खेळाडू त्यांच्या आलिशान कारसाठीही प्रसिद्ध आहेत. तर आज आम्ही तुम्हाला धोनी आणि हार्दिकच्या कारच्या दमदार कलेक्शनबद्दल सांगत आहोत.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे जगभरातील प्रसिद्ध कार आहेत. त्याच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर माहीकडे मर्सिडीज बेंझ GLE 250d, Vintage Rolls Royce Silver Wraith ll, 1970 Modus Ford Mustang 429 Fastback, Jeep Grand Cherokee SRT, 1970 मॉडेल Pontiac Firebird Trans Am, Hummer H2, Nissan A Jon, 1970 हे मॉडेल आहेत. Q7, Mitsubishi Pajero SFX, Land Rover Freelander 2, Ferrari 599 GTO 139, Mahindra Scorpio आणि हिंदुस्तान मोटर्स अॅम्बेसेडर सारख्या कार्सही आहेत. महेंद्रसिंग धोनीकडे कितीतरी सुपरबाइकही आहेत.
पांड्याच्या कार्सचा संग्रह
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे BMW 5 Series, BMW 6 Series Gran Turismo, Mercedes Benz AMG G63, Range Rover Autobiography Long Wheelbase, Audi A6, Lamborghini Huracan Evo, Land Rover Range Rover Vogue, Mercedes G-Wagon, Rolls हे मॉडेल्स आहेत.तसंच पोर्श केयेन तसेच जीप कंपास सारख्या कार्सदेखील त्याच्या कलेक्शनमध्ये आहेत.