कोणतीही कार किंवा बाइकचे इंजिन हे त्याचे हृदय असते. हृदय ठीक तर बॉडी ठीक. त्यामुळे याला वेळोवेळी पाहणे व बदलणे आवश्यक आहे. याला व्यवस्थित ठेवण्यासाठी लुब्रिकेंटची गरज असते. जर तुम्ही कार किंवा बाइक चालवत असाल तर आपल्या बाइक किंवा कारचे इंजिन नेहमी योग्य ठेवायला हवे. यासाठी वेळोवेळी लुब्रिकेंटला बदलायला हवे. किती दिवसात हे बदलायला हवे, यासंबंधीची माहिती या ठिकाणी देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.
इंजिनचा जास्त आवाज करणे
जर तुमच्या बाइक मधून जास्त आवाज येत असेल तर बाइकचे इंजिन बदलण्याची गरज आहे. फ्रेस लुब्रिकेंट इंजिनच्या आत अनेक दिवस बाइक चालवल्यामुळे लुब्रिकेंटची क्षमता गमावते. यामुळे इंजिन मधून जास्त मोठा आवाज येत असतो.
डॅशबोर्ड वॉर्निंग लाइट
सध्या बाइक्स सेन्सर्स असतात. बाइकच्या इंजिनमध्ये सेन्सर दिलेले असते. जे तुमच्या बाइकच्या इंस्ट्रूमेंट क्लस्टरवर लुब्रिकेंट कमी होण्याच्या स्थितीत वॉर्निंग लाइट देतात. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली तर समजून जा की, बाइक मध्ये इंजिन ऑइल कमी झाले आहे. त्यामुळे इंजिन ऑइल बदलायला हवे.
जास्त खाली जाणे
जवळपास सर्वच बाइक्स मध्ये इंजिन ऑइल ब्लॉकच्या किनाऱ्यावर इंजिन ऑइल स्तराची तपासणी करण्यासाठी एक छोटी विंडो दिली जाते. जर तुम्हाला वाटत असेल की, विंडोमध्ये इंजिन ऑइलचा स्तर कमीत कमी खाली गेला आहे. तर समजून जा की, इंजिन ऑइलला टॉप अप करण्याची वेळ आली आहे.
इंजिन ऑइल काळे होणे
काही बाइक सुद्धा कार प्रमाणे डिपस्टिक सोबत येतात. तर काही तेलाच्या स्तरावर तपासणी करण्यासाठी विंडो सोबत येतात. आपल्या बाइकमध्ये टाकलेल्या इंजिनला वेळोवेळी तपासायला हवे. सुरुवातीत ऑइल हे हलक्या भुरक्या रंगा सोबत येते. नंतर ते काळ्या रंगाचे होते. तुम्ही तुमच्या बोटाने हे चेक करू शकता.
इंजिन ऑइल बदलणे गरजेचे
जास्तीत जास्त लोक हे कारची सर्विस १० हजार किमी झाल्यानंतर करतात. अनेकदा इतके चालवण्यासाठी खूप वेळ लागतो. कारमध्ये टाकलेले इंजिन ऑइल खराब झालेले असते. त्यामुळे वेळोवेळी इंजिन ऑइल बदलणे गरजेचे आहे.
कधी होते एक्सपायर
इंजिन ऑइलचे आयुष्य हे चार वर्षापर्यंत असते. यापेक्षा जास्त याचा वापर करता कामा नये. जास्तीत जास्त कंपन्या आपल्या ग्राहकांना पाच ते १० हजार किलोमीटर किंवा जवळपास एक वर्षाच्या आत इंजिन ऑइल बदलण्याचा सल्ला देत असतात.
काय असते नुकसान
जर तुम्ही कारमध्ये टाकलेले इंजिन खूप वर्षापूर्वी टाकलेले असेल तर ते काम करीत नाही. ते खराब होते. याची तपासणी करण्यासाठी थोडे इंजिन ऑइल बाहेर काढायला हवे. हे पाहायला हवे की, हलक्या रंगात दिसायला जास्तीत जास्त घट्ट किंवा काळे दिसत नाही. याशिवाय, अनेकदा इंजिन ऑइल खराब झाल्यानंतर त्याचा वास येतो. यामुळे कार चालवताना ऑइलमुळे जास्त धूर सुद्धा बाहेर पडत असतो.
कसे होते काम
इंजिन ऑइलचे काम हे आतील पार्ट्सला सुरक्षित ठेवणे आणि कार चालवताना इंजिनचे तापमान कमी करणे आहे. बाजारात अनेक प्रकारचे इंजिन ऑइल मिळते. ज्यात सिंथेटिक आणि फुल सिंथेटिक सारखे ऑइल असतात. तर ग्रेडच्या माहितीनुसार, बाजारात इंजिन ऑइल उपलब्ध आहेत.
कधी होते एक्सपायर
इंजिन ऑइलचे आयुष्य हे चार वर्षापर्यंत असते. यापेक्षा जास्त याचा वापर करता कामा नये. जास्तीत जास्त कंपन्या आपल्या ग्राहकांना पाच ते १० हजार किलोमीटर किंवा जवळपास एक वर्षाच्या आत इंजिन ऑइल बदलण्याचा सल्ला देत असतात.