शेअर बाजार विक्रमी उच्चांकाजवळ, सेन्सेक्स 63,474 वर, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 इंडेक्समध्ये तेजी दिसत आहे आणि दोन्ही निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्स 138.07 अंकांनी किंवा 0.22 टक्क्यांनी वाढला आणि हा निर्देशांक 63,522.65 च्या पातळीवर उघडला. याशिवाय निफ्टी 50 मध्ये 43.20 अंकांची किंवा 0.23 टक्क्यांची वाढ झाली आणि हा निर्देशांक 18,869.20 च्या पातळीवर उघडला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात 1,771 शेअर्समध्ये खरेदी आणि 588 शेअर्समध्ये विक्री होत आहे. याशिवाय 173 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान, भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडले.
आज शेअर बाजार आपल्या विक्रमी उच्च पातळीच्या अगदी जवळ आला आहे आणि लवकरच तो सर्वकालीन उच्च पातळी ओलांडून नवीन विक्रमी उच्चांक करेल असा अंदाज आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

बजाज फिनसर्व्हचा शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 0.89 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 0.75 टक्के, सन फार्मामध्ये 0.72 टक्के, लार्सन अँड टुब्रोमध्ये 0.70 टक्के, टायटनमध्ये 0.67 टक्के, टाटा स्टीलमध्ये 0.61 टक्के, एशियन पेंट्समध्ये 0.61 टक्के, नेस्ले इंडियामध्ये 0.59 टक्के. पॉवरग्रीड 0.49 टक्के, एचडीएफसी 0.49 टक्क्यांनी आणि एचडीएफसी 0.46 टक्क्यांनी वाढले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

एनटीपीसी, इंडसइंड बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, विप्रो, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेल हे शेअर्स सेन्सेक्सवर घसरणीसह व्यवहार करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने