महाराष्ट्र : वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वडाची पूजा करतात आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्षायुष्यासाठी उपवास ठेवतात. पूर्वपरंपरागत ही पूजा करण्यात येते. आता अनेक जणी ही पूजा अथवा उपवास करत नाहीत. पण इथर कोणत्याही गोष्टींपेक्षा वडाची पूजा करणं याला आरोग्यदायी काय महत्त्व आहे तुम्हाला माहीत आहे का?
वडाच्या पूजेचे आरोग्यदायी महत्त्व आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. खरंतर आपली संस्कृती आणि सण हे ऋतुमानानुसार बनविण्यात आले असून प्रत्येक सणाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. वातारवणात होणाऱ्या बदलानुसारच, वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. आधी याला धार्मिक वळण होते. मात्र शिकेलेल्या पिढीला याचे शास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व सांगितले तर नक्कीच त्यांना याचे महत्त्व पटू शकते.
वटपौर्णिमा करण्याचे आरोग्यदायी कारण
वटपौर्णिमा ही नेहमी पावसाळ्याच्या दिवसात येते. साधारण पाऊस सुरू झाला की वटपौर्णिमेचा सण असतो आणि या काळात वातावरण बदलामुळे अनेकदा आजाराचे प्रमाण वाढते. या आजारांपासून दूर राहाता यावं यासाठी वडाच्या झाडाचा फायदा करून घेण्यात येतो. त्यामुळेच वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा केली जाते.
ऑक्सिजन अधिक मिळते
वडाच्या झाडातून २४ तास ऑक्सिजन मिळते. पूर्वी घराबाहेर महिला पडत नव्हत्या. वडाच्या झाडाच्या पूजेच्या निमित्ताने त्यांना ऑक्सिजन अधिक मिळायचा आणि आजारांपासून दूर राहण्यास मदत व्हायची. आजही प्रदूषणाच्या या जगात वडाच्या झाडापासून ऑक्सिजन मिळाल्यास, अधिक ताजे, प्रसन्न राहण्यास मदत मिळते.
गर्भाशयाच्या आरोग्यासाठी वडाचा उपयोग
महिलांच्या गर्भाशयाच्या आरोग्यासाठी वडाच्या झाडाच्या सालीचा उपयोग होतो असं सांगण्यात येतं. तसंच योनीमार्गातील इन्फेक्शन दूर करण्यासाठीही वडाच्या सालीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. याशिवाय ज्यांना रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शचाही त्रास आहे त्यांनी वडाच्या सालीचा उपयोग करून घ्यावा.
वडाप्रमाणे सांभाळावे आरोग्य
वडाच्या झाडाचे आयुष्य अधिक असते. वडाचं झाड हे प्रतिकात्मक असून याचे मूळ खोलवर पसरलेले असते. वडाच्या मुळांचं नातं जसं मातीशी घट्ट राहातं तसंच आरोग्याशी घट्ट नातं राहावं आणि आरोग्य वडाप्रमाणेच चांगलं राहावं यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.