विशाळगडावर पशू-पक्षांची हत्या करून त्यांचे अन्न शिजवण्यास बंदी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगड येथे पशू-पक्षांची हत्या करून त्यांचे अन्न शिजवण्यास बंदी घालणारा आदेश पुरातत्त्व विभागाने लागू केला आहे. शाहूवाडीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे. विशाळगडावर मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ, दारु आणि गांजा विक्री तसेच सेवन करुन हुल्लडबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने त्याला प्रतिबंध करण्याची मागणी होत होती.




त्यास अनुसरून संरक्षित स्मारकाच्या क्षेत्रात पशुपक्षी हत्या करून त्यावर प्रक्रिया करता येणार नाही असे एका शासन आदेशात नमूद केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या १९९८ च्या आदेशानुसार देवी देवतांच्या नावाने सार्वजनिक ठिकाणी पशुपक्षी बळी देण्यास मनाई केली आहे. हा संदर्भ देऊन विशाळगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या परिसरात पशु हत्या बंदी अनुषंगाने कार्यवाही करावी, असे पत्र पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांनी पाठवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने