‘या’ चार भारतीय महिलांनी फोर्ब्सच्या यादीत मिळवले स्थान, हे आहे कारण

भारतीय वंशाच्या महिला जगभरात आपला नावलौकिक वाढवत आहेत. फोर्ब्सने १०० श्रीमंत महिलांच्या यादीत भारतीय वंशाच्या चार महिलांनाही स्थान दिले आहे.या चौघींची एकत्रित संपत्ती ४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. फोर्ब्सच्या यादीत संगणक नेटवर्किंग फर्म अरिस्ता नेटवर्क्सच्या अध्यक्ष आणि सीईओ जयश्री उल्लाल, आयटी सल्लागार आणि आऊटसोर्सिंग फर्म सिंटेलच्या सह संस्थापक नीरजा सेठी, क्लाऊड कंपनी कॉन्फ्लुएंटच्या सह संस्थापक आणि माजी सीटीओ नेहा नारखेडे आणि पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नूयी यांचा समावेश आहे. शेअर बाजारातील वाढीदरम्यान फोर्ब्सच्या १०० श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट असलेल्या महिला व्यावसायिकांच्या एकूण निव्वळ संपत्तीमध्ये वर्षभरापूर्वीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढ झाली आणि त्यांची संपत्ती १२४ अब्ज डॉलर झाली आहे.जयश्री उल्लाल यांची निव्वळ संपत्ती किती?

Arista Networks च्या अध्यक्ष आणि CEO जयश्री उल्लाल या यादीत १५ व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २.४ अब्ज डॉलर आहे. २००८ पासून त्या अरिस्ता नेटवर्क्सच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. Arista Networks च्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास २०२२ मध्ये ४.४ बिलियन डॉलर एवढी कमाई केली. जयश्री उल्लाल या क्लाउड कॉम्प्युटिंग कंपनी स्नोफ्लेकच्या संचालक मंडळावरही आहेत.

नीरजा सेठी २५व्या स्थानावर आहेत

या यादीत नीरजा सेठी २५व्या क्रमांकावर आहे. ज्यांची एकूण संपत्ती ९९ दशलक्ष डॉलर्स आहे. सेठी आणि त्यांचे पती भरत देसाई यांनी १९८० मध्ये स्थापन केलेली सिंटेलला फ्रेंच आयटी फर्म Atos एसईने ऑक्टोबर २०१८ मध्ये ३.४ अब्ज डॉलर्सना विकत घेतली. सेठीला अंदाजे ५१० दशलक्ष डॉलरचे शेअर मिळाले.

नेहा नारखेडे क्लाऊड कंपनी कॉन्फ्लुएंटच्या सह संस्थापक

दुसरीकडे ३८ वर्षीय नेहा नारखेडे या क्लाऊड कंपनी कॉन्फ्लुएंटच्या सह संस्थापक आणि माजी CTO आहेत, त्या ५२० दशलक्ष डॉलर संपत्तीसह यादीत ३८व्या स्थानावर आहेत.

इंद्रा नूयी यांच्याकडे किती संपत्ती?

PepsiCo च्या माजी अध्यक्षा आणि CEO इंद्रा नूयी २४ वर्षे कंपनीबरोबर राहिल्यानंतर २०१९ मध्ये निवृत्त झाल्या. त्यांची एकूण संपत्ती ३५० दशलक्ष डॉलर आहे आणि त्या या यादीत ७७ व्या स्थानावर आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने