ऑगस्टमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर

आपल्या जीवनात बँक हा महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा आपल्याला खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा पैसे जमा करण्यासाठी किंवा जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेत जावे लागते. ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास या महिन्याची बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासा आणि त्यानुसार घराबाहेर पडा. बँकेने जाहीर केलेल्या यादीनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये एकूण १४ दिवस बँका बंद राहतील. परंतु ऑगस्ट महिन्यात १४ दिवस बँका बंद असल्या तरी अनेक राज्यांमध्ये या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असतात.बँका १४ दिवस बंद राहणार

ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँकेने बँकांना १४ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. म्हणजेच ऑगस्टमध्ये सण, जयंती आणि शनिवार-रविवार यामुळे एकूण १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत, याशिवाय ओणम, रक्षाबंधनामुळे देशातील अनेक भागात बँका बंद राहणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली

६ ऑगस्ट – रविवारी देशभरात बँकांना सुट्टी असेल.
८ ऑगस्ट – रम फाटच्या कारणास्तव गंगटोकमधील तेंडोंग लो येथे बँकांना सुट्टी दिली जाणार आहे.
१२ ऑगस्ट – देशात दुसऱ्या शनिवारी बँकेला सुट्टी आहे.
१३ ऑगस्ट – रविवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात बँकांना सुट्टी असेल.
१६ ऑगस्ट – पारशी नववर्षानिमित्त मुंबई, नागपूर आणि बेलापूरला बँकांना सुट्टी असेल.
१८ ऑगस्ट – श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त गुवाहाटीमध्ये बँक बंद राहतील.
२० ऑगस्ट – रविवारी देशभरातील बँका बंद.
२६ ऑगस्ट – चौथ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहणार.
२७ ऑगस्ट – रविवारी देशभरातील बँकांना सुट्टी आहे.
२८ ऑगस्ट – ओणमसाठी कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँकेला सुट्टी मिळणार.
२९ ऑगस्ट – तिरुओनममुळे कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद.
३० ऑगस्ट – रक्षाबंधनामुळे जयपूर आणि शिमल्यात बँकेला सुट्टी असणार.
३१ ऑगस्ट – डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुअनंतपुरममध्ये रक्षाबंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लाहबसोलमुळे बँकांना सुट्टी असणार.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने