पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक न करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ज्यांनी ३० जून २०२३ पर्यंत आपले पॅन आधारशी लिंक केले नाही, त्यांचे पॅनकार्ड १ जुलै २०२३ पासून कार्यरत राहणार नाही, असंही प्राप्तिकर विभागाने सांगितले आहे. ज्या करदात्यांनी पॅन आधारशी अद्याप लिंक केलेले नाही ते १५ प्रकारची कामे करू शकणार नाहीत. विशेष म्हणजे प्राप्तिकर विभागाने या कामांची यादी आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. परंतु याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे ज्यांनी अद्यापही आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेले नाही, ते करदाते ३१ जुलै २०२३ पूर्वी त्यांचे प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरू शकणार नाहीत. कारण आता ITR ची मुदत संपायला अवघ्या महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. आयटीआर भरण्यासाठी पॅनकार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही रिटर्न फाइल करू शकत नाही. निष्क्रिय पॅन पुन्हा सक्रिय केल्यास त्याला जास्तीत जास्त ३० दिवस लागतील. त्यामुळे आयटीआर भरण्याची मुदतही संपणार आहे.
तुम्ही पॅन पुन्हा सक्रिय करण्यासाठी प्रयत्न केल्यास ITR दाखल करण्याची अंतिम मुदत निघून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३१ जुलै २०२३ च्या अंतिम मुदतीनंतर जर ITR दाखल केला असेल, तर तो विलंबित ITR म्हणून दाखल केला जाईल. विलंबित ITR भरण्यासाठी विलंब शुल्क किंवा दंड भरावा लागतो, जो वार्षिक ५ लाखांपेक्षा जास्त कमाई करणार्यांसाठी ५,००० रुपये आहे. यासह पॅन सक्रिय करण्यासाठी १००० रुपये दंड आहे. एकूण तुम्हाला ६,००० रुपये द्यावे लागतील. पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी १,००० आणि उशिरा ITR भरण्यासाठी ५००० रुपयांचा दंड आहे. विशेष म्हणजे तुमचे एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल, तर उशिरा ITR भरण्यासाठी १,००० रुपये उशिरा फायलिंग शुल्क लागू होईल. विशेष म्हणजे तुम्हाला फक्त २,००० रुपये (विलंबित आयटीआर फायलिंग फीसाठी १,००० रुपये आणि पॅन-आधार लिंकिंगसाठी १,००० रुपये) भरावे लागतील.
पॅन कार्ड पुन्हा कसे सक्रिय करावे?
पॅन कार्ड सक्रिय करण्यासाठी १००० रुपये दंड भरावा लागेल. याबरोबरच प्राधिकरणाला आधार कार्डबाबत माहिती द्यावी लागणार आहे. यासह तुमचे पॅन कार्ड ३० दिवसांच्या आत पुन्हा सक्रिय होईल. तुम्हाला प्राप्तिकर ई-फायलिंग वेबसाइटवर तुमच्या खात्यात लॉग इन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर प्रोफाइल विभागात जा. येथे ‘Link PAN with Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा. आता येथे आवश्यक माहिती भरा. आता तुम्हाला ई-पे टॅक्सद्वारे १००० रुपये दंड भरावा लागेल. हा दंड भरणा ‘इतर पेमेंट्स’ स्वरूपात असेल.