चांद्रयान ३ हे चांद्रयान २ पेक्षा किती आणि कसे वेगळे? जाणून घ्या दोघांतील फरक

‘चांद्रयान ३’ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. ‘चांद्रयान २’ मोहिमेतील लँडर चांद्रभूमीवर कोसळले होते. २०१९मध्ये झालेल्या या मोहिमेनंतर आता चार वर्षांनी ‘चांद्रयान ३’ चंद्रावर उतरणार आहे. त्यानमित्त या दोन्ही मोहिमांतील महत्त्वाच्या फरकांवर एक नजर…

‘चांद्रयान २’ : चंद्राचा पृष्ठभाग, तेथील खनिज घटक आणि ध्रुवीय प्रदेशांतील बर्फाबद्दलचा अभ्यास करणे हे होते. मोहिमेत कक्षीय यान (ऑर्बिटर), लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश होता.

‘चांद्रयान ३’ : चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग करून, रोव्हर चालवण्याचे; तसेच चंद्रावरील मातीचे विश्लेषण करणारे वैज्ञानिक प्रयोग करण्याचे उद्दिष्ट आहे. मोहिमेमध्ये प्रॉपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे.
उद्देश आणि आव्हाने

‘चांद्रयान २’ : चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग करण्यात अपयश आले. या मोहिमेतील कक्षीय यान (ऑर्बिटर) चंद्राच्या कक्षेतून मौल्यवान माहिती पृथ्वीवर पाठवत आहे.

‘चांद्रयान ३’ : यातील प्रॉपल्शन मॉड्यूलवर ‘स्पेक्ट्रोपोलरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ’ हा ‘पे लोड’ आहे. त्याद्वारे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीची मोजमापे घेतली जातील.

लँडर

‘चांद्रयान २’ : लँडरला पाच ‘थ्रस्टर्स’ होते आणि ५०० बाय ५०० चौरस मीटर भागात लँडिंगची मर्यादित क्षमता होती. कक्षीय यानाने घेतलेल्या छायाचित्रांचा वापर लँडिंगसाठी केला गेला.

‘चांद्रयान ३’ : लँडरमध्ये चार ‘थ्रस्टर्स’ आणि मजबूत ‘लेग्ज’ आहेत. चार किलोमीटर बाय अडीच किलोमीटर क्षेत्रात लँडिंगची क्षमता आहे. ‘चांद्रयान २’च्या यानाने पाठवलेली माहिती सॉफ्ट लँडिंगसाठी वापरली गेली. याशिवाय लँडरमध्ये अतिरिक्त सौर पॅनेल आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने