फिरायला गेल्यावर रस्ता चुकण्याचं टेन्शन सोडा! इंटरनेट नसतानाही वापरता येईल 'गुगल मॅप'

या महिन्यात जोडून सुट्ट्या आल्यामुळे बऱ्याच जणांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला आहे. तुम्हीदेखील लाँग वीकेंडची मजा घेण्यासाठी बाहेर पडणार असाल, तर गुगल मॅपचं एक खास फीचर तुमच्या नक्कीच कामी येईल.

बऱ्याच वेळा फिरायला गेल्यानंतर काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेट मिळत नाही. अशा वेळी गुगल मॅप न वापरता आल्यामुळे वाट चुकण्याची भीती असते. मात्र, यावर गुगलने एक उपाय शोधला आहे. यामुळे तुम्ही इंटरनेट नसतानाही गुगल मॅप वापरू शकाल.
गुगल मॅप्स ऑफलाईन

गुगल मॅप्स ऑफलाईन असं या फीचरचं नाव आहे. यामुळे तुम्ही एखाद्या ठिकाणापर्यंतचा रस्ता डाऊनलोड करून ठेऊ शकता. सेव्ह केलेला असल्यामुळे पुढे इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क नसतानाही हे अ‍ॅप तुम्हाला रस्ता दाखवू शकतं. अर्थात, यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी, इंटरनेट उपलब्ध असताना तुम्हाला मॅप डाऊनलोड करावा लागेल.

अशी करा सेटिंग

  • यासाठी तुम्हाला सर्वात आधी गुगल मॅप्स हे अ‍ॅप उघडावं लागेल.

  • त्यानंतर त्या जागेचं नाव सर्च करा, जिथे तुम्हाला जायचं आहे.

  • यानंतर तुम्हाला अपेक्षित मार्ग समोर आल्यानंतर खाली असणाऱ्या अ‍ॅड्रेस बारवर टॅप करा.

  • त्यामध्ये more पर्यायावर टॅप केल्यानंतर Download Offline Map हा ऑप्शन दिसेल. यावर टॅप करून तुम्ही मॅप डाऊनलोड करू शकाल.

दुसरा एक पर्याय

  • याशिवाय, एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी तेथील जागांचा मॅप तुम्हाला हवा असेल, तर तोही तुम्ही डाऊनलोड करू शकता.

  • यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल मॅप्स अ‍ॅप उघडावं लागेल.

  • त्यानंतर प्रोफाईल फोटोवर टॅप करून, ऑफलाईन मॅप्स हा पर्याय निवडा.

  • यानंतर तुम्ही स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉईंट निवडून ठराविक ठिकाणाचा मॅप डाऊनलोड करू शकाल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने