Zomato शेअर तेजीच्या ट्रॅकवर, गुंतवणूकदारांच्या जीवात जीव! आता खरेदी करावा? तज्ञ म्हणतात...

मुंबई : झोमॅटोने आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून तिमाहीत दोन कोटींचा निव्वळ नफा नोंदवला. पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूलही वार्षिक ७०.९ टक्क्यांनी वाढून २,४१६ कोटी रुपयांवर पोहोचला असून झोमॅटोला वर्षभरापूर्वीच्या तिमाहीत १८६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर वर्षभरापूर्वीच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल १,४१४ कोटी रुपये होता. पहिल्या तिमाहीत नफा नोंदवून सर्वांना आश्चर्यचकित केल्यानंतर झोमॅटोच्या शेअरला ब्रोकरेज हाऊसेसची पसंती मिळत आहे. जेफरीज, एचएसबीसी आणि यूबीएसने यावर गुंतवणुकीचा दृष्टिकोन ठेवला आहे. इतर ब्रोकरेजने संमिश्र मत दिले आहे.
झोमॅटोवर ब्रोकरेजचे मत

जेफरीज

जागतिक ब्रोकरेज जेफरीजने झोमॅटोवर बाय रेटिंग दिले असून शेअर्ससाठी लक्ष्य १०० रुपयांवरून १३० रुपये प्रति शेअर केले आहे. ब्रोकरेजच्या अहवालानुसार तिमाही निकालांनी कंपनीच्या नफा कमावण्याच्या क्षमतेबद्दलची चिंता दूर केली आहे. हे निकाल व्यवस्थापन आणि त्याच्या अंमलबजावणी क्षमतेला अधिक बळकटी देत आहेत.

HSBC

जागतिक ब्रोकरेज HSBC ने झोमॅटोवर बाय रेटिंग दिले असून शेअरसाठी लक्ष्य ९३ रुपयांवरून १०२ रुपये प्रति शेअर करण्यात आले आहे. ते म्हणतात की कंपनी पुढील काही वर्षांत ४०% पेक्षा जास्त उत्पन्न वाढवण्याची अपेक्षा करते. कंपनीच्या नफ्यात आणखी सुधारणा अपेक्षित आहे.

जेपी मॉर्गन

झोमॅटोवर जेपी मॉर्गनला ओव्हरवेट रेटिंग असून शेअरसाठी लक्ष्य १०० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आले आहे. ते म्हणतात की कंपनीने FY24 च्या अंतिम मुदतीपूर्वी EBITDA आणि PAT ब्रेकईव्हन चांगले साध्य केले, त्यामुळे कंपनीच्या कार्यक्षमतेवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल.

UBS

UBS ने झोमॅटोवर बाय रेटिंग दिले असून शेअर्ससाठी लक्ष्य ९० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आले आहे. ते म्हणतात की पहिल्या तिमाहीत निकाल अपेक्षेपेक्षा खूपच चांगला होता.

मॉर्गन स्टॅनली

मॉर्गन स्टॅनलीने झोमॅटोवर ओव्हरवेट रेटिंग आहे. त्याचे शेअर लक्ष्य ८५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आले आहे.

नोमुरा

नोमुराने झोमॅटोवर रिड्यूस रेटिंग दिले आहे. त्याचे शेअर लक्ष्य ६० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आले आहे. दीर्घकाळ चांगली कामगिरी करणे कंपनीसाठी आव्हानात्मक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने