मर्दानी खेळांचे गणेशोत्सवात का वाढलं आकर्षण? मर्दानी खेळ कसे आहेत, इतिहास काय सांगताे

भारतातील शिवकालीन युद्ध कला सगळीकडे प्रसिद्ध आहे. स्वराज्य स्थापनेत छत्रपती शिवाजी महाराजांना महत्त्वाचे योगदान देणाऱ्या युद्ध कलेला मर्दानी खेळ म्हणून ओळखले जाते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मर्दानी खेळांना राज्यभरात मोठी मागणी आहे.

भारताला युद्धकलेची मोठी परंपरा लाभली आहे. ही परंपरा टिकवण्यासाठी अनेक राज्यांत विविध प्रयत्न सुरू आहेत. काही शासकीय पातळीवर, तर बहुतांश प्रयत्न हे व्यक्तिगत पातळीवर आहेत. अनेक वस्ताद, मंडळे यासाठी काम करत आहेत. केवळ कोल्हापुरातच ७० पेक्षा अधिक शिवकालीन प्रशिक्षण केंद्रे आहेत. याला मर्दानी खेळाचा आखाडा म्हणतात.
शिवकालीन युद्धकला ही माणसाला परिपूर्ण बनविणारी कला आहे. यात दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी अशा मर्दानी खेळाचा समावेश हाेताे. मर्दानी खेळांतील प्रत्येक क्षण ,प्रत्येक जणांने गणेशोत्सव मिरवणूकीमध्ये ‘याची देही याची डोळा’ अनुभवला. लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा या खेळांतील चपळता, क्षणात फिरणारी तलवार, अचूक वेग घेणारी तलवारीची पात, टाळ्यांचा कडकडाटात गणेशोत्सव मिरवणूकीत या युद्धकलांनी नवचैतन्य निर्माण केले.

पुरुषांबरोबर तरुणीही या मर्दानी खेळात अग्रेसर आहेत , नऊवारी साडी नेसून आणि कपाळावर चंद्रकोर लावून तरुणी या खेळांमध्ये सहभागी हाेतात विशेष बाब म्हणजे हातात काठी, ढाल, तलवार घेतली की, जणूकाही त्यांच्यात लढवयै अवतरतात.

शिवकालीन ढोल, ताशा वाद्यांसह मर्दानी खेळांची या परंपरा माेलाची ठरते. भावी पिढी या परंपरेचा माेल कसा राखेल, डीजेच्या गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणाईला हा इतिहास समजणं गरजेच आहे.

मैदानी खेळ व इतिहास

मैदानी खेळ म्हणजे असे खेळ जे मैदानावर खेळले जातात. यामधे संपूर्ण शरीराची हालचाल होते, शरीराचा व्यायाम होतो, व शरीर तंदुरुस्त राहते. मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात.

"आयुर्ध तु प्रहरणम्ं" म्हणजे प्रहार करणे व संरक्षण करणे असा ढोबळ अर्थ, स्वरक्षणांसाठी अश्मयुगांत मानवाने दगडांच्या कपारीचा, झाडांच्या फांद्याचा उपयोग केला हाेता, नंतरच्या काळात विशिष्ट शास्त्र निर्माण झाले , ते योग्यरितीने कसे हाताळायचे याचे नियम व धडे दिले गेले. यातूनच जगाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारचे आत्मरक्षणाचे कलाप्रकार अस्तित्वात आले Mallakhamba , Kung Fu, Jujutsu, Karate Judo, अशा अनेक कला क्रीडा प्रकार निर्माण झाले.

तलवारबाजी

तलवारबाजी या खेळला खूप पूर्वीच्या काळापासून महत्व आहे. मध्ययुगीन काळामध्ये म्हणजेच ५ व्या शतकापासून ते १५ व्या शतकापर्यंत तलवार हे शस्त्र युद्धामध्ये वापरले जात होते. तलवारबाजी हा प्राचीन काळापासून खेळला जाणारा खेळ असल्यामुळे या खेळाला प्राचीन खेळ म्हणून ओळखतात. तलवारबाजी हा खेळ भारत देशामध्ये १९७० नंतर सुरू झाला आणि फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया ची स्थापना १९७४ मध्ये झाली.

  • तलवारबाजी हा खेळ १८९६ मध्ये आधुनिक खेळ म्हणून घाेषित
  • ऑलिम्पिकमध्ये कायमस्वरूपी खेळल्या गेलेल्या ५ खेळांपैकी एक
  • तलवारबाजीचे मैदान ज्याला पिस्ट म्हणतात हे ४६ फूट लांब आणि ६ फूट रुंद असते.
  • वजन वर्ग नसलेला एकमेव लढाऊ खेळ

लाठी-काठी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत असलेला हा एक प्राचीन मर्दानी खेळ. स्वसंरक्षण व शत्रूवर हल्ला करणे यातून लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला. प्राचीन काळात बचाव व हल्ला यांसाठी सुरूवातीला झाडाच्या फांदीच्या वापर होत हाेता, दोन प्रतिस्पर्धी एकमेकाच्या शरीराला लाठीचा स्पर्श करून गुण मिळवतात. लाठी अंगाभोवती न थांबू देता गरगर फिरवून एकातून एक अशी वर्तुळे निर्माण करण्यात खरे कौशल्य असते. शासकीय सेवेत लाठीचा आजही उपयोग होतो.

दांडपट्टा

दांडपट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. दांडपट्टा ही एक प्राणघातक तलवार होती, ज्यावर मराठा योद्धांचे नियंत्रण होते असे म्हटले जाते. मराठ्यांच्या प्रमुख शस्त्रांमध्येही त्याचा समावेश होता. अनुभवी योद्धे या घातक तलवारीवर नियंत्रण ठेवू शकतात. मराठ्यांव्यतिरिक्त, राजपूत योद्धे आणि मुघलांनी देखील याचा वापर केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने