आता रिमोट घेण्यासाठी जागेवरून उठायची गरज नाही, मोबाईललाच बनवा TV चा रिमोट

कामावरून घरात आल्यावर जेव्हा एखादा व्यक्ती एसीचं वारं घेत सोफ्यावर पाय पसरतो. जगात काय चाललंय म्हणून टिव्ही ऑन करायचं म्हणतो तेव्हा त्याला समजतं की, रिमोट तर खूप दूर आहे. तेव्हा कोणीतरी येईल आणि आपल्या हातात आयता रिमोट देईल, अशी अपेक्षा त्याची असते.\

तसं होत नाही. स्वत:च उठून रिमोट घ्यावा लागतो. आता तुम्हाला जागा सोडण्याची आणि टिव्हीसाठी रिमोटचीही गरज नाही. रिमोटशिवाय टिव्ही कसा सुरू करायचा. आणि रिमोटसाठी दुसरा कोणता ऑप्शन आहे, हे आपण पाहुयात.
Google TV अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्टफोन वापरून तुमचा Android TV नियंत्रित करू शकता. याचा अर्थ तुम्ही चॅनेल बदलू शकता, व्हॉल्यूम वाढवू शकता किंवा कमी करू शकता आणि तुमची आवडती अॅप्स लाँच करू शकता.

तुम्ही हे सर्व फक्त तुमच्या फोनने करू शकता, टीव्ही रिमोटची गरज न लागता. तुमच्या Android फोन किंवा iPhone वर Google TV अॅप कसे सेट करायचे आणि तुमचा स्मार्टफोन टीव्ही रिमोट म्हणून कसा वापरायचा ते येथे आहे.

हे कसे Install करायचे

Google Play Store उघडा आणि Google TV ॲप इंस्टॉल करा. लक्षात ठेवा तुमचा टीव्ही आणि फोन एकाच वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट केलेला असणे आवश्यक आहे. तुमच्या टीव्हीमध्ये वाय-फाय नसल्यास, तुम्ही तुमचा फोन आणि टीव्ही कनेक्ट करण्यासाठी ब्लूटूथ वापरू शकता.

Google TV ॲप उघडा. अप उघडल्यानंतर, रिमोट बटण टॅप करा. ॲप डिव्हाइसेस स्कॅनर ओपन करेल. तुमचा टीव्ही सापडल्यानंतर, लिस्टमधून तो निवडा.

तुमच्या टीव्ही स्क्रीनवर एक कोड दिसेल. ॲपमध्ये कोड एंटर करा आणि पेअर वर टॅप करा. आता तुम्ही तुमच्या फोनच्या रिमोटने Android TV कंट्रोल करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने