7 दिवसात मिळवा कोरियन महिलांसारखी चमकदार त्वचा,या सोप्या उपायांचा वापर करा

प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिची त्वचा चमकदार असावी आणि ती दीर्घकाळ तरूण आणि सुंदर दिसावी.यासाठी सर्वांनी त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. नाहीतर काही काळानी ही त्वचा निर्जीव आणि कोरडी व्हायला लागते. काही स्त्रिया पार्लरमध्ये तासनतास घालवतात आणि यासाठी खूप पैसेही खर्च करतात.

अशा परिस्थितीत तुम्ही घरगुती उपायांकडे वळले पाहिजे जे स्वस्त आणि प्रभावी आहेत. या घरगुती उपायांपैकी एक म्हणजे तांदूळ ज्याचा वापर त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठी बराच काळ केला जात आहे. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी तुम्ही तांदळांने बनवलेला फेसपॅक वापरू शकता. पण फक्त तांदळाचे पाणी लावण्यापेक्षा तुम्ही तांदळाच्या पाण्यामध्ये अनेक गोष्टी वापरून फेसपॅक तयार करू शकता.चला तर मग जाणून घेऊयात आपण फेसपॅक कसा तयार करू शकतो.
​तांदूळ मध आणि लिंबूपासून बनवलेला फेस पॅक

सर्वात आधी अर्धी वाटी उकडलेले तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा. आता या मिश्रणात १ चमचा मध आणि १ चमचा लिंबाचा रस घाला. तिन्ही गोष्टी नीट मिसळा. आता तुमचा फेस पॅक तयार आहे. आता तुमचा चेहरा स्वच्छ करा. आता हा फेस पॅक 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. तांदळापासून बनवलेला हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून एकदा जरूर लावा.

​तांदूळ आणि दह्यापासून बनवलेला फेस पॅक

तांदळात अमिनो अॅसिड आणि जीवनसत्त्वे असतात जे त्वचेला गोरे करण्याचे काम करतात . त्वचेचा पोत सुधारण्यासाठी तुम्ही तांदूळ बारीक वाटून त्यात मध आणि ३ चमचे दही घालून चांगले फेटून चेहऱ्याला लावा. अर्धा तास चेहरा असाच राहू द्या आणि नंतर हलक्या हातांनी चोळा.५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. हे सुरकुत्या आणि काळी वर्तुळे दूर ठेवण्यास आणि त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करते.हा उपाय सात दिवस केल्यास तुम्हाला नितळ त्वचा मिळण्यास मदत होईल.

तांदूळ आणि कोरफड यांचा फेस पॅक

एक चमचा तांदूळ पीठ,अर्धा चमचा कोरफड जेल आणि गुलाबपाणीचे सुमारे 5-6 थेंब मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर सुमारे १५ ते २० मिनिटे राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता. कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. याशिवाय, त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आणि वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.

तांदूळ आणि खोबरेल तेलाचा फेस पॅक

एका भांड्यात २ चमचे तांदळाचे पीठ, एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. तुमचा राइस फेस पॅक तयार आहे. तुमचा चेहरा स्वच्छ केल्यानंतर आता हा फेस पॅक 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. ते सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.आठवड्यातून दोनदा रात्री चेहऱ्यावर हा फेस पॅक लावल्यास त्याचा परिणाम लवकर होतो. यामुळे त्वचेची टॅनिंग दूर होते.

​तांदूळ केशरपासून बनवलेला फेस पॅक

सर्व प्रथम एका भांड्यात 2 चमचे दूध आणि केशरच्या 4 पाकळ्या टाका आणि 15 मिनिटे ठेवा. या दुधात केशर आपला रंग सोडेल. त्यानंतर त्याच भांड्यात 4 चिमूटभर हळद आणि एक चमचा तांदळाचे पीठ घाला. सर्व गोष्टी एकत्र करून पेस्ट तयार करा. आता तुमचा तांदळाचा फेस पॅक तयार आहे. आता तुमचा चेहरा स्वच्छ करा आणि सकाळी 15 मिनिटांसाठी हा फेस पॅक लावा. ते सुकल्यावर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावा. हा फेस पॅक लावल्याने तुमची त्वचा चमकदार दिसते.

​तांदूळ आणि काकडीचा फेस पॅक

एका चमचे तांदळाच्या पिठात सुमारे 3 चमचे काकडीचा रस मिसळा. आता चेहरा स्वच्छ केल्यानंतर हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि साधारण 15 ते 20 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ करा. काकडीच्या रसामुळे त्वचेला संपूर्ण पोषण मिळते. हे त्वचेची जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी कार्य करते आणि सूर्यप्रकाशापासून आराम देते.

​तांदूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले फेस पॅक

आजकाल काळ्या वर्तुळांची समस्या सामान्य आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी एक चमचा तांदूळ आणि गव्हाचे पीठ घेऊन त्यात एक चमचा टोमॅटोचा रस मिसळा. चांगले मिसळा आणि डोळ्याभोवती पेस्ट लावा. बटाट्याची दोन साले डोळ्यांवर ठेवा आणि पाच मिनिटे राहू द्या. ते पूर्णपणे कोरडे झाल्यावर ते धुवा. हे आठवड्यातून दोनदा करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने