लीबियामध्ये विनाशकारी महापूर! आतापर्यंत पाच हजारांहून अधिक मृत्यू, १० हजार नागरिक बेपत्ता

लीबिया मध्ये महापूर आला असून यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. या पूराचा सर्वाधिक फटका डेरना या शहराला बसला आहे. येथे ७०० लोक गाढले गेले आहेत तर मृतांचा आकडा खूप मोठा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण या पूरात १०,००० लोक बेपत्ता आहेत. लीबियात झालेल्या भीषण पावसामुळे आलेल्या पूराने सगळीकडे पाणी भरले असून देशात आतापर्यंत ५,२०० हून अधिक मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

भीषण पूरामुळे प्रशासनाला मृतदेह शोधण्यात अडचणी येत आहेत. लीबियातील माजी सरकारमधील आरोग्य मंत्री उस्मान अब्दुल जलील यांनी देशातील परिस्थिती भयावह असल्याचे सांगितले. डेरना येथे घटनास्थळी पोहचलेल्या जलील यांनी शहारातील रुग्णलये मृतदेहांनी भरून गेल्याचे सांगितले. डेरना येथे अजूनही शेकडो मृतदेह गाढले गेलेले आहेत किंवा समुद्रात वाहून गेलेत असेही त्यांनी सांगितलं.सरकारी अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, लीबियातील फक्त डेरना शहरात आतापर्यंत २,३०० लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीजचे लीबियातील दूत टॅमर रमदान यांनी सांगितले की, या अभूतपूर्व पुरात १०,००० लोक बेपत्ता असल्याचे सांगितले तर पंतप्रधान ओसामा हमद यांनी दोन धरणं फुटल्याने बेपत्ता लोक वाहून गेले असून त्यांच्यापैकी अधिकतर लोक जीवंत सापडण्याची शक्यता खूप कमी असल्याचे म्हटले आहे.

लीबियन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सुसा, मार्ज आणि शाहट या प्रदेशांमध्ये देखील पूरस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. हजारो कुटुंब विस्थापित झाले आहेत. त्यांनी बेनगाजी शहर आणि पूर्व लीबियामध्ये इतर शहरातील शाळा आणि सरकारी इमारतींमध्ये आसरा घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने