World Tourism Day 2023: भारताबाहेरही आहेत हिंदू मंदिरं; परदेशातल्या प्रमुख मंदिरांविषयी जाणून घ्या एका क्लिकवर

जगातील सर्वात जुना धर्म म्हणजे हिंदू धर्म. दक्षिण आशियातल्या अनेक देशांतील लोक या धर्माचे पालन करतात. हिंदू मंदिरांचा इतिहास आणि रचना या धर्माच्या उत्कर्षाच्या कथेइतकीच रंजक आहे. हिंदू मंदिरे शतकानुशतके बांधली गेली आणि परकीय आक्रमणांदरम्यान नष्ट झाली. काळाच्या ओघात जगात सीमा निर्माण झाल्या आणि अनेक देश अस्तित्वात आले. आज आम्ही तुम्हाला अशा काही हिंदू मंदिरांबद्दल माहिती देणार आहोत जी भारताबाहेर आहेत.
अंगकोर वाट, कंबोडिया

जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर अंगकोर वाट, कंबोडिया हे आहे. हे १२ व्या शतकात खमेर राजवंशाचा राजा सूर्यवर्मन द्वितीय याने बांधलं होतं. १६२ हेक्टरमध्ये पसरलेलं हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. १२ व्या शतकाच्या अखेरीस ते भगवान बुद्धाच्या मंदिरात रूपांतरित झाले. कंबोडियाचं हे मंदिर जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे.

पशुपतीनाथ मंदिर, काठमांडू

नेपाळची राजधानी काठमांडू इथं पशुपतीनाथ मंदिर ७५३ मध्ये बांधलं गेलं. महादेवाला समर्पित हे मंदिर राजा जयदेव यांनी बांधलं होतं आणि हे नेपाळमधील सर्वात जुन्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची वास्तू भारतीय मंदिरांच्या स्थापत्य रचनेपेक्षा खूपच वेगळी आहे. काही पौराणिक कथा असंही सांगतात की हे मंदिर इसवीसन पूर्व ४०० मध्ये बांधलं होतं. मंदिराची जी रचना आपण आता पाहतो ती १६९२ मध्ये बांधली गेली होती.पशुपतीनाथ कॉम्प्लेक्समध्ये ५१८ मंदिरे आणि स्मारके आहेत.

श्री सुब्रमण्य स्वामी देवस्थानम, मलेशिया

भगवान मुरुगन यांचा सर्वात उंच पुतळा मलेशियाची राजधानी क्वालालंपूरच्या उत्तरेला आहे. या मंदिरात जाण्यासाठी भाविकांना २७२ पायऱ्या चढाव्या लागतात. १८९० मध्ये एल. पिल्लई यांनी हा पुतळा बांधला आणि बटू लेण्यांच्या बाहेर स्थापित केला.

कटासराज मंदिर, पाकिस्तान

चकवाल, पाकिस्तानचे कटासराज मंदिर हे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. महाभारत काळात पांडवांनी या मंदिरात आश्रय घेतल्याच्या आख्यायिका आहेत. असं म्हणतात की सतीच्या मृत्यूनंतर महादेवाच्या दोन अश्रूंपासून दोन तलाव तयार झाले, एक तलाव पुष्करमध्ये आणि दुसरा कटासराजमध्ये आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार इथे अनेक मंदिरं काश्मिरी स्थापत्यशास्त्रात बांधली गेली आहेत.

प्रंबनन मंदिर, इंडोनेशिया

हे मंदिर जावा इथं ९व्या शतकात बांधलं गेलं. प्रंबनन मंदिर ट्रिनिटी - ब्रह्मा, विष्णू, महेश यांना समर्पित आहे. महेशाचे मंदिर सर्वात मोठं असून मध्यभागी आहे. मंदिर परिसरामध्ये ८ मुख्य 'गोपुरम' आहेत जे शेकडो लहान गोपुरांनी वेढलेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर रामायण आणि भागवत पुराणातील कथा कोरल्या आहेत.

श्री व्यंकटेश्वर मंदिर, इंग्लंड

भारतातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरापासून प्रेरणा घेऊन बांधलेलं हे मंदिर युरोपमधील सर्वात मोठं मंदिर आहे. भगवान व्यंकटेश्वराला समर्पित हे मंदिर २३ ऑगस्ट २००६ रोजी उघडण्यात आलं. मंदिरात वेंकटेश्वराची १२ फुटी मूर्ती आहे. मुख्य देवतेमध्ये देवतेची पत्नी पद्मावती आणि भगवान हनुमान यांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर प्रत्येक धर्माच्या लोकांसाठी खुले आहे.

राधा माधव मंदिर, यूएसए

राधा माधव मंदिराला बरसाना धाम असंही म्हणतात. हे टेक्सासमधील सर्वात जुनं मंदिर आणि उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठं मंदिर आहे. या मंदिराभोवती ध्यान केंद्रेही बांधण्यात आली आहेत.

श्री शिव सुब्रमण्य मंदिर, फिजी

फिजीमध्ये भारतीय वंशाचे अनेक लोक राहतात. श्री शिव सुब्रमण्य मंदिर हे सुमारे १०० वर्षे जुने मंदिर आहे.

श्री काली मंदिर, म्यानमार

हे अंदाजे १५० वर्षे जुनं मंदिर म्यानमारची राजधानी यंगून इथे असलेल्या लिटल इंडियामध्ये आहे. १८७१ मध्ये तामिळ स्थलांतरितांनी ते बांधलं होतं. त्यावेळी ब्रह्मदेश (आताचा म्यानमार) ब्रिटिशांच्या ताब्यात होता. यांगूनमध्ये राहणारे भारतीय या मंदिराची देखभाल करतात.

दत्तात्रेय मंदिर, त्रिनिदाद आणि टोबॅगो

भारताबाहेर भगवान हनुमानाची सर्वात उंच मूर्ती कारापिचाईमा, त्रिनिदाद आणि टोबॅगो इथं आहे. या पुतळ्याची उंची ८५ फूट आहे. या पुतळ्याचे बांधकाम २००१ मध्ये पूर्ण झालं. दत्तात्रेय मंदिर हे गणपती सच्चिदानंद यांना समर्पित आहे आणि मंदिराच्या पश्चिमेला हनुमानाची मूर्ती आहे.

मुरुगन मंदिर, ऑस्ट्रेलिया

मुरुगन मंदिर सिडनी, ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स भागात आहे. इथे राहणाऱ्या एका तामिळ माणसानं ते बांधून घेतलं होतं. त्याची देखरेख हिंदू सोसायटी ऑफ शैव-मनराम करते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने