IND Vs PAK Live: भारत-पाक सामन्याचा उत्साह शिगेला, थोड्याच वेळात सुरु होणार खास कार्यक्रम

भारत-पाकिस्तान सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मोठमोठ्या दिग्गजांपासून ते क्रिकेटप्रेमींपर्यंत सर्वच जण या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा बहुप्रतीक्षित असा सामना पाहण्यासाठी गोळा होणार आहेत. दोन्ही संघ आत्मविश्वासाने भरलेले आहेत. या हायव्होल्टेज सामन्यासाठी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमही सज्ज झाले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ एकदिवसीय विश्वचषकात इंडियाची अजिंक्य विजयगाथा रोखू पाहणार आहे, तर भारताला हे यश मिळवून १४० कोटींहून अधिक चाहत्यांना ८-० अशा विजयी अंकांची भेट द्यायची आहे.
खास कार्यक्रम

आपल्या सोशल मीडियावर माहिती देताना बीसीसीआयने सांगितले की, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी विशेष कार्यक्रम होणार आहे. सामना सुरू होण्यापूर्वी होणारा हा कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी १.३० वाजता होईल. हा सामना पाहण्यासाठी देशातील अनेक बडे कलाकार आणि राजकारणीही उपस्थित राहणार आहेत. अरिजित सिंहसोबत शंकर महादेवन, सुनिधी चौहान, नेहा कक्कर आणि पंजाबी गायक सुखविंदर सिंग या कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत.

आजची प्लेइंग इलेव्हन काय असू शकते?

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये इशान किशनच्या जागी शुभमन गिलचे पुनरागमन होऊ शकते. कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत याचे संकेत दिले होते.

भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

भारतामध्ये जवळपास ११ वर्षांनंतर भारत-पाक एकदिवसीय सामना

टीम इंडिया तब्बल ११ वर्षांनंतर भारतीय भूमीवर पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे. शेवटचे दोन्ही संघ ६ जानेवारी २०१३ रोजी दिल्लीत आमनेसामने आले होते. त्या कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताचा डाव अवघ्या १६७ धावांवर आटोपला. पाकिस्तानचा संघ केवळ १५७ धावा करू शकला. भारताने हा सामना १० धावांनी जिंकला.

७००० सैनिक

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्ती अहमदाबादला पोहोचत आहेत. दोन दिवसांत १०० हून अधिक चार्टर्ड विमाने अहमदाबादमध्ये उतरण्याची शक्यता आहे. ७००० हून अधिक सैनिक सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात झाले आहेत. स्वतंत्र स्निफर डॉग, ड्रोनविरोधी पथक आणि बॉम्ब निकामी पथक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने