विश्वचषकात भारतीय संघाला झटका, शुभमन गिलची तब्येत बिघडली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार नाही?

भारतीय संघाला २०२३ च्या विश्वचषकात पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. १२ वर्षांपासून विश्वचषक ट्रॉफीची वाट पाहणारा भारतीय संघ यावेळी विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र विश्वचषकातील मोहीम सुरू करण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सलामीवीर शुभमन गिलला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे कठीण असल्याचे समोर येत आहे.


शुभमन गिलला नेमकं काय झालं?

भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शुभमन गिलला डेंग्यू झाल्याचे समोर येत आहे. असा दावा दैनिक जागरणच्या अहवालात करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र, संघ व्यवस्थापनाने अद्याप आशा सोडलेली नाही. शुक्रवारी दुसऱ्या फेरीच्या चाचण्यांनंतर गिलच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेतला जाईल. भारतीय संघ रविवारी विश्वचषकातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात गिल तंदुरुस्त होण्यात अपयशी ठरल्यास, डावाच्या सुरुवातीला इशान किशन किंवा केएल राहुल कर्णधार रोहित शर्मासह सलामी देतील असे पर्याय उपलब्ध आहेत. ईशानने गेल्या काही काळापासून मधल्या फळीत फलंदाजी केली असली तरी तो नियमित सलामीवीर आहे. वेळोवेळी इशानही डावाची सुरुवात करताना दिसतो. आशिया चषकापूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यावर सलामी
देताना त्याने सलग ३ सामन्यात अर्धशतक ठोकले. आशिया चषकाच्या अंतिम फेरीतही तो सलामीला फलंदाजीला आला होता.

प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताच्या सर्वात युवा फलंदाजाची अनुपस्थिती संघासाठी एक धक्का असेल कारण तो यावर्षी उत्कृष्ट फॉर्मात आहे. २०२३ मध्ये शुभमन गिलची बॅट धावा नव्हे तर जणू आगच लावत आहे. तो या वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. २० सामन्यांमध्ये गिलने ७२ च्या सरासरीने १२३० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ५ शतके आणि अर्धशतके आहेत. गिल वनडे फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तो बाबर आझमलाही पहिल्या क्रमांकासाठी तगडे आव्हान देत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने