डाएटमध्ये ३०% फळांचा असावा वापर, सद्गुरू जग्गी वासुदेवांच्या मते पचनक्रिया राहाते उत्तम, कोणती फळे खावीत

फळं हा आपल्या डाएटचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे आणि फळांच्या नियमित सेवनामुळे शरीर निरोगी राहाते आणि आवश्यक पोषक तत्व शरीराला प्राप्त होण्यास मदत मिळते. याशिवाय फळांच्या सेवनाने शरीराला दिवसभर आवश्यक असणारी एनर्जीदेखील मिळते.

सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यानुसार, आपण सर्वांनाच आपल्या आहारामध्ये किमान ३०% फळांचा समावेश करून घ्यायला हवा. फळं खाण्यामुळे पचनक्रिया अधिक सोपी होते आणि अनेक आजार आपल्या शरीरापासून दूर राहण्यास मदत मिळते. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे फळांच्या सेवानाने पचनक्रिया कशी उत्तम राहाते आणि काय काय फायदे शरीराला मिळतात जाणून घेऊया.
फळांच्या सेवनाने होणारा फायदा

सद्गुरू सांगतात की, फळांच्या नियमित सेवनाने आपले शरीर अधिक चांगले पोषक तत्व मिळवून निरोगी राहू शकते. ब्लड प्रेशर, हार्ट स्ट्रोक, हृदयरोग आणि मधुमेह अर्थात डायबिटीससारखे आजार नियंत्रणात राखण्यासाठी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये फळांचा अवश्य समावेश करून घ्यावा.

कधीही फळं खाणं शरीरासाठी योग्य ठरतं. मात्र सकाळच्या वेळी फळं खाल्ल्यास, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते.

आरोग्यासाठी कसा होतो उपयोग

सद्गुरूंनी म्हटल्याप्रमाणे तुम्ही आपल्या आहारात फळांचा समावेश करून घ्यावा. तुमची जीवनशैली कशीही असली तरीही फळं खाल्ल्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास अधिक फायदेशीर ठरते.

खनिज आणि शरीरातील विटामिन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी नियमित फळांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. फळांमध्ये विटामिन ए, विटामिन ई आणि विटामिन सी चा खजिना भरलेला आहे, जो शरीरासाठी आवश्यक ठरतो.

कोणती फळं खावीत

शरीर हेल्दी राखण्यासाठी अनेक फळांचा तुम्ही वापर करून घेऊ शकता. ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही पोटॅशियमयुक्त असणारे रताळे, अवाकाडो, केळे आणि सफरचंदाचे सेवन करावे. ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी संत्री, केळे आणि अवाकाडोचे सेवन उत्तम ठरते.

केसांची काळजी घेण्यासाठी फळांचे सेवन हे टॉनिकप्रमाणे काम करते. अँटीऑक्सिडंट्सयुक्त फळं ही स्किन चांगली राखण्यास मदत करतात आणि शरीरातील विटामिन्सची कमतरता भरून काढतात.

पचनक्रिया सुधारण्यासाठी

फळांमध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यासाठी रोज सफरचंद खाणे अधिक उत्कृष्ट समजण्यात येते. मात्र आजकाल रसायनमुक्त सफरचंद मिळणे कठीण झाले आहे.

त्यामुळे तुम्ही केमिकलयुक्त सफरचंदाऐवजी हंगामी फळांचा समावेश आपल्या नाश्त्यामध्ये केल्यास तुम्हाला अधिक फायदा मिळतो आणि पचनक्रिया चांगली होऊन बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

हंगामी अर्थात Seasonal Fruits अधिक चांगले

मौसमी अथवा हंगामी अर्थात Seasonal Fruits हे शरीरासाठी अधिक उत्तम ठरतात. सद्गुरूंच्या मते तुम्ही जर आपल्या डाएटमध्ये ३०% फळांचा समावेश केला तर पोटातील घाण साफ व्हायला मदत मिळते आणि तुमची पचनक्रिया उत्तम राहाते.

पेर, पेरू, सीताफळ, रामफळ, स्ट्रॉबेरी, कलिंगड अशी हंगामी फळं आवर्जून खावीत. आतड्यांचे आरोग्य सुधारून शरीर अधिक हेल्दी राहण्यास मदत करते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने