जंक फूड, तिखट तेलकट पदार्थ खाणं तसंच चुकीच्या वेळी चुकिच्या पदार्थांचं सेवन करणं यामुळे अॅसिडिटी म्हणजेच पित्त आणि पोट फुगण्याच्या समस्या उद्भवतात.
सध्या या बदललेल्या जीवनशैलीमुळे अपचन आणि पोट फुगण्याची समस्या ही एक सामान्य समस्या बनली आहे.
अनेकांना चुकीच्या आहार पद्धतींमुळे Unhealthy Diet या समस्येचा वेळोवेळी सामना करावा लागतो. अनेकदा तिखट तेलकट पदार्थ खाल्ल्याने किंवा चुकीच्या वेळी अन्न खाल्ल्याने अन्नाचं योग्य प्रकारे पचन होत नाही. यामुळे पोट फुगतं. तसंच काही वेळी पोटदुखी होवू लागते.
खास करून सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नाही आणि पोट फुललेलं वाटू लागतं. यामुळे दिवसाची सुरुवातच योग्य होत नसल्याने तुमच्या दिवसभरातील कामांवर त्याचा परिणाम होवू लागतो.
पित्त किंवा ब्लोटिंग म्हणजेच पोट फुलण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सकाळची सुरुवात काही होममेड हेल्दी ड्रिंक्सने करू शकता. ज्यामुळे तुम्हाला अॅसिडीटी किंवा पोट फुगीच्या समस्येपासून आराम मिळेल.
जीरा- जीऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सि़डट्स असल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. तसंच जीऱ्यामध्ये कार्मिनेटिव्ह गुणधर्म असल्याने पोट थंड राहण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर जीऱ्याच्या पाण्याचं सेवन केल्याने पोटातील सूज कमी होण्यास मदत होते. तसंच अॅसिडिटीची समस्या दूर होते.
यासाठी तुम्ही रात्री झोपताना एक ग्लास पाण्यात पाण्यामध्ये १ चमचा जीरं भिजत ठेवा सकाळी या पाण्याचं सेवन करा. तसंच तुम्ही सकाळी १ ग्लास पाण्यात जीरं उकळून हे पाणी गाळून ही त्याचं सेवन करू शकता.
आलं आणि लिंबाचा चहा- जर तुम्हाला पित्ताचा किंवा पोट फुगीचा त्रास असेल तर तुम्ही सकाळची सुरुवात चहाने करण्याएवजी हेल्द ड्रिंकने करणं जास्त उपयुक्त ठरेल. यासाठी तुम्ही आलं आणि लिंबाच्या चहाचं सेवन करू शकता. आलं आणि लिंबाच्या चहाच्या सेवनामुळे आतड्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
काकडी पुदीना ड्रिंक- ब्लोटिंगची समस्या दूर होण्यासाठी तुम्ही काकडी पुदीना ड्रिंकचं सकाळी सेवन करू शकता. पुदीन्यामुळे पोट थंड राहण्यास मदत होते. तर काकडी आणि लिंबामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
या ड्रिंकमुळे शरीराला आवश्यक अँटीऑक्सिडंट्स मिळाल्याने पित्ताची समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी हे ड्रिंक तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एका काकडीचे तुकडे, ७-८ पुदिन्याची पानं आणि २ चमचे लिंबाचा रस टाकून ग्राइंड करा आणि या ज्यूसचं सेवन करा.
सैंधव मीठाचं पाणी- जर तुम्हाला सकाळच्या वेळी एखाद्या हर्बल टीचं सेवन करणं शक्य नसेल तर तुम्ही एक सोप्पा पर्याय निवडू शकता. यासाठी पाण्यामध्ये थोडं आलं उकळून घ्या. त्यानंतर पाणी गाळून त्यात चिमूटभर सैंधव मीठ आणि मध टाकून या पाण्याचं सेवन करा. सकाळी या ड्रिंकचं सेवन केल्याने तुमची पित्त आणि पोट फुगीची समस्या दूर होईल.
अशा प्रकारे तुम्ही घरीच तयार केलेल्या काही ड्रिंकचं सकाळी सेवन केल्यास तुमची ब्लोटिंग तसंच पित्ताची समस्या दूर होईल.