एका रात्रीत पांढऱ्या केसांना करा काळेभोर, 10 रुपयांत मिळतील घनदाट केस

आपल्यापैकी बरेच जण आपले पांढरे केस काळे करण्यासाठी करण्यासाठी अनेक उपाय करतात. परंतु अनेक गोष्टी करूनही अनेकांचे केस काळे होत नाहीत. तुम्ही जे रंग वापरता त्या रंगात अमोनिया असते. ज्यामुळे तुमचे केस काळे होऊ शकतात पण केसांचे नुकसान होते.या रंगांमुळे केस गळणे, केस तुटणे, कमकुवत टाळू, केस कोरडे होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

पण घरात असणाऱ्या अनेक गोष्टींच्या मदतीने तुम्ही घनदाट काळे केस मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्यामुळे तुम्ही एका रात्रीमध्ये काळेभोर घनदाट केस मिळवू शकता.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी १० रुपायात तु्म्ही हे उपाय करू शकता.या मिश्रणाने केस होतात काळे

केस काळे करण्यासाठी तुम्ही कांदा,आवळा आणि खोबरेल तेल यांचे मिश्रण लावू शकता.चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

यासाठी लागणारे आवश्यक साहित्य

आवळा - १ टीस्पून

नारळ तेल - 1 टीस्पून

कांद्याचा रस - 2 चमचे

काळी हळद - 1 टीस्पून

मास्क बनवण्याची योग्य पद्धत

सर्व प्रथम एका भांड्यात खोबरेल तेल, काळी हळद, आवळा आणि कांद्याचा रस एकत्र करा. सर्वकाही चांगले मिसळा आणि थोडे गरम करा, जेणेकरून जास्तीचे पाणी निघून जाईल.आता हे मिश्रण केसांना लावा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी सामान्य पाण्याने केस धुवा. या काळात शॅम्पू वापरण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा. यामुळे तुमचे केस काही दिवसांतच काळे होऊ शकतात.

कांद्याचे फायदे

कांद्याचा रस केसांसाठी खूप चांगला आहे. यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे टाळूची जळजळ कमी होते. हे तुमचे केस जाड आणि मुलायम देखील बनवू शकते. त्यामुळे कोरड्या केसांची समस्याही कमी होऊ शकते.

कांदा नियमित लावल्यास केस पांढरे होण्याची समस्याही दूर होऊ शकते. कांद्यामध्ये सल्फर असते जे पातळ केसांना घट्ट होण्यास मदत करते आणि नवीन केस वाढवण्यास मदत करते. हे अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे आणि डोक्यातील कोंडा आणि किरकोळ संक्रमण दूर ठेवते.

खोबरेल तेल

खोबरेल तेल केसांसाठी शतकानुशतके वापरले जात आहे. केस काळे करण्यासाठी आणि केसांना खोलवर मॉइश्चरायझ करण्यासाठी हे खूप प्रभावी ठरू शकते. याचा नियमित वापर केल्यास केस लगेच काळे होण्यास मदत होते. केसांच्या मुळांनी गरम खोबरेल तेलाचा वापर करा.

आवळा

आवळा हे व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्रोत आहे, जो तुमचे केस आणि टाळू मजबूत करतो. तसेच केस काळे होण्यास मदत होते. त्यामुळे केस खराब होण्याची शक्यता फारच कमी असते.यासाठी तुम्ही आवळा कॅन्डीचा देखील वापर करू शकता.रोज आवळ्याचे सेवन करण्याचा प्रयत्न करा.

केसांनी हळद लावल्याने होण्याचे फायदे

केसांसाठी हळद लावणे खूपच फायदेशीर मानले जाऊ शकते. संशोधनांमध्ये असे मानले जाते की हळदीचा वापर अ‍ॅलोपेसिया एरियाटा उपचारात उपयुक्त ठरू शकतो . हळदीमुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.त्याचप्रमाणे पांढरे केस काळे होण्यास मदत होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने