सणासुदीच्या दिवसांमध्ये कर्ज घेताय? मग आधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्याच, नाहीतर हप्ते भरताना येतील नाकीनऊ

देशभरातील ग्राहक आणि विक्रेते नवरात्रीपासून सणासुदीच्या हंगामाची आतुरतेने वाट पाहतात. विशेषतः दिवाळीच्या काळात भांडी तसेच सोन्या-चांदीची खरेदी शुभ मानले जाते. टाच कारणामुळे लोक घर, कार, मालमत्ता आदी खरेदीसाठी सणासुदीच्या प्रतीक्षेत असतात. तसेच ग्राहकांची मागणी पाहता बँका आणि इतर वित्तीय संस्था देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर कर्ज ऑफर देतात. पण, सणासुदीच्या काळात विचार न करता आणि योग्य तपासणी न करता घेतलेले कर्जही तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते.

अशा परिस्थिती जर तुम्ही सणोत्सवात कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर काळजीपूर्वक विचार करा. कर्ज घेताना बहुतेक लोक केवळ व्याजदर पाहूनच कर्ज घेतात आणि इतर गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. अशा स्थितीत हाच निष्काळजीपणा कर्जाची परतफेड करताना तुम्हाला नंतर महाग पडतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात कर्ज घेताना कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेऊया.
क्रेडिट स्कोर तपासा

या दिवाळीत कोणतीही खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासणे आवश्यक आहे. क्रेडिट स्कोअर कमी असल्यास बँका जास्त व्याज आकारतात. बहुतेक वित्तीय संस्था ७५०+ हा चांगला क्रेडिट स्कोअर मानतात, त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास आवश्यक असेल तरच कर्ज घेण्याचा विचार करा.

कर्ज निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्या...

कर्जाचा पर्याय नेहमी विचारपूर्वक निवडला पाहिजे. जर तुम्हाला महागडा टीव्ही घ्यायचा असेल तर तुम्ही कंझ्युमर ड्युरेबल लोन आणि वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. परंतु दोघांचे व्याज, प्रक्रिया शुल्क इत्यादींची तुलना केल्यानंतरच कोणते कर्ज चांगले ते ठरवा. म्हणेज कर्ज घेण्यापूर्वी उपलब्ध असलेल्या कर्जाच्या सर्व पर्यायांचे मूल्यांकन करा, त्यांच्या वैशिष्ट्यांची तुलना करा आणि नंतर एक निवडा.

नियम व अटी काळजीपूर्वक तपासा

सणासुदीच्या काळात बँका आणि वित्तीय संस्था अनेक ऑफर्स देतात. परंतु या ऑफर घेण्यापूर्वी तुम्ही नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. कर्जाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजे कारण बहुतेकदा बँका अशा अटी ठेवतात की स्वस्त दिसणारे कर्ज देखील ग्राहकांना महागडं पडते. म्हणून सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा आणि कर्जाच्या अटी पूर्णपणे समजून घ्या.

तुमच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करा

दिवाळीच्या निमित्त कर्ज घेण्यापूर्वी कर्जाच्या परतफेड करण्याच्या तुमच्या क्षमतेचे मूल्यांकन करा. कर्ज एक मोठे आर्थिक ओझे असते आणि तुम्हाला मासिक हप्त्यांमध्ये भरावे लागते. जर तुम्ही EMI भरू शकत नसल्यास तुम्हाला फक्त दंडच नाही तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही त्याचा नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे भविष्यात कर्ज मिळणे कठीण होते. म्हणून जेव्हा तुम्हाला तुमच्या परतफेडीच्या क्षमतेबद्दल पूर्ण विश्वास असेल तेव्हाच तुम्ही कर्ज घेता याची खात्री करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने