दिवाळीत फक्त हिरवे फटाकेच फोडण्यास परवानगी; सरकारकडून सक्त सूचना, ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियम लागू

दिव्यांचा सण दीपावली जवळ येत असताना, कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियम लागू कले आहेत. रात्री ८ ते १० या वेळेत हिरवे फटाकेच वाजवावेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सण साजरा करण्यात येणार असून, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्या आहेत. त्यानुसार रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवता येतील आणि फक्त हिरवे फटाके लावावेत.




फटाक्यांच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्देश दिले असून, अधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या विक्रीवर गांभीर्याने तपासणी करावी. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी हिरव्या फटाक्यांव्यतिरिक्त इतर फटाके विकत असल्यास संपूर्ण गोदाम सील करण्यात यावे. संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. हिरवे फटाके क्यूआर कोड चिन्ह नसलेले फटाके जप्त करावेत. उत्सवात फक्त हिरवे फटाके वापरावेत. पशू, पक्षी, लहान मुले, वृद्ध यांना त्रास न होता त्यांचा वापर करावा. पाच ते २० नोव्हेंबर या कालावधीत सतत वायू प्रदूषण चाचणी करावी.

सर्व जिल्हा केंद्रांची मोजमाप करून चाचणी करावी. राज्याबाहेरील अनधिकृत फटाक्यांना बंदी आहे. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांमार्फत नियमांचे पालन करण्याबाबत कार्यवाही करावी. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि निषिद्ध ठिकाणी फटाके फोडण्यास परवानगी नाही. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिस विभागांनी याचे सक्तीने पालन करावे, असे मंडळाने म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने