राज्यात पुढील ४८ तासांत 'या' जिल्ह्यात होणार अवकाळी पाऊस; IMDचा इशारा

 गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यात हवामान खात्याने वर्तवली आहे.येत्या ४८ राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाची शक्यताहवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी शेतीपिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवार आणि शुक्रवारी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

येत्या ४८ तासांत मुंबई, पुणे ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने