भारतात 'या' 20 गाड्यांची रेकॉर्डब्रेक विक्री; मारुती वॅगनआर टॉप वर, Hyundai-Tata सह इतरांचे विक्री अहवाल पाहा

भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार

गेल्या महिन्यातील कार विक्रीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये कार सेल्स रिपोर्टमध्ये पून्हा एकदा मारुती सुझुकीचा दबदबा राहिला आहे. मारुतीकडे टॉप 10 मध्ये 6 आणि टॉप 20 मध्ये 10 कार आहेत. मारुती सुझुकी वॅगनआर पुन्हा एकदा भारतात सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे आणि लोकांनी सणासुदीच्या काळात ती मोठ्या प्रमाणात खरेदी केली. मारुती सुझुकीच्या टॉप 5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या लिस्टमध्ये 4 कार आहेत. त्याच वेळी, टाटा मोटर्सची सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा नेक्सॉन पुन्हा एकदा सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही बनली आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला भारतातील टॉप 20 कारबद्दल सांगणार आहोत, जाणून घ्या डिटेल्स.




मारुती सुझुकी वॅगनआर जलवा

जर आपण ऑक्टोबर 2023 च्या कार विक्री अहवालावर नजर टाकली तर, मारुती सुझुकी वॅगनआरच्या एकूण 22,080 युनिट्सची विक्री झाली आहे. यानंतर मारुती सुझुकी स्विफ्ट दुसऱ्या क्रमांकावर राहिली, जी 20,598 ग्राहकांनी खरेदी केली. Tata Nexon SUV तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांची एकूण विक्री 16,887 युनिट्स होती. मारुती सुझुकी बलेनो चौथ्या क्रमांकावर होती, जीने 16,594 युनिट्स गेल्या ऑक्टोबरमध्ये विकल्या होत्या. यानंतर मारुती ब्रेझा आहे, ज्याचे एकूण 16,050 युनिट्सची गेल्या महिन्यात विक्री झाली.

सहाव्या क्रमांकावर असलेल्या टाटा पंच आहे, जीने एकूण 15,317 युनिट्सची विक्री केली. मारुती सुझुकी डिझायर सेडान सातव्या क्रमांकावर होती, जीने एकूण 14,699 युनिट्सची विक्री केली. सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुती सुझुकी एर्टिगा 8व्या क्रमांकावर होती आणि गेल्या महिन्यात 14,209 ग्राहकांनी खरेदी केली होती.

महिंद्रा स्कॉर्पिओ देखील टॉप 10 मध्ये

महिंद्रा स्कॉर्पिओ मालिका भारतात ऑक्टोबर 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 20 कारच्या लिस्टमध्ये 9 व्या क्रमांकावर होती, ह्या कारचे एकूण 13,578 युनिट्स सेल झाले आहे. यानंतर 10 व्या क्रमांकावर Hyundai Creta होती, जीने एकूण 13,077 युनिट्सची विक्री केली. 11व्या क्रमांकावर असलेल्या मारुती सुझुकी Eeco ने एकूण 12975 युनिट्सची विक्री केली. Kia Seltos या यादीत 12 व्या क्रमांकावर असून गेल्या महिन्यात एकूण 12,362 युनिट्सची विक्री झाली. यानंतर, Hyundai Venue च्या एकूण 11,581 युनिट्सची विक्री झाली आहे. मारुती सुझुकी फ्रँक्सच्या एकूण 11,357 युनिट्सची विक्री झाली आहे. 15 व्या क्रमांकावर मारुती सुझुकी अल्टो K10 आहे, जीने 11,200 युनिट्स विकल्या आहेत.

टोयोटा इनोव्हा देखील चांगली विक्री

ऑक्टोबर 2023 च्या टॉप 20 कारमध्ये मारुती सुझुकी ग्रँड विटारा 16 व्या क्रमांकावर आहे, जी 10,834 ग्राहकांनी खरेदी केली. यानंतर महिंद्रा बोलेरो सीरिजच्या 9647 युनिट्स, महिंद्रा एक्सयूव्ही 700 च्या 9297 युनिट्स, टोयोटा इनोव्हा सीरिजच्या 8,183 युनिट्स आणि ह्युंदाई एक्सेटरच्या 8096 युनिट्सची विक्री झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने