दिवाळी भेटवस्तूंवरही फुटतो टॅक्सचा बॉम्ब, नातेवाईकांनी दिलेल्या गिफ्ट्सवरील आयकर नियम

दिवाळी म्हणजे दीपोत्सवाचा सण आता तोंडावर आला आहे. दिवाळी जसजशी जवळ येते तसतशी नातेवाईक, मित्र आणि कंपनीकडून कोणती भेटवस्तू आणि किती बोनस मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रतीक्षा करत असतो. पण तुमची भेट देखील करपात्र आहे की नाही हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला भेटवस्तूवर कधी आणि किती कर भरावा लागेल हे सांगणार आहोत.

दिवाळीच्या निमित्त नातेवाईक आणि कंपनीकडून मिळालेला बोनसवरही आयकर लागू होतो. क्लिअर टॅक्सनुसार दिवाळीत भेटवस्तू पैसे किंवा जंगम/अचल मालमत्ता ज्या एखाद्या व्यक्तीला दुसर्‍या व्यक्ती किंवा संस्थेकडून कोणत्याही पेमेंटशिवाय मिळत. कायदेशीर शब्दात बोलायचे तर भेटवस्तू देणार्‍या व्यक्ती किंवा संस्थेला देणगीदार असे नाव दिले जाते तर भेटवस्तू प्राप्तकर्त्याला दाता म्हणून ओळखले जाते.




भेटवस्तूंवर आयकर नियम काय?

आयकर नियमांनुसार एका आर्थिक वर्षात ५०,०० रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू करमुक्त आहेत. तर भेटवस्तूची रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास ती करपात्र होते. म्हणजेच जर तुम्हाला एका वर्षात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची भेटवस्तू मिळाली तर तुम्हाला संपूर्ण रकमेवर आयकर भरावा लागेल.

उदाहरणार्थ जर तुम्हाला एका आर्थिक वर्षात २५,००० आणि २८,००० रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्या तर एकूण रक्कम ५३,००० रुपये होईल. अशा परिस्थितीत ते तुमच्या उत्पन्नात जोडले जाईल आणि त्यावर तुम्हाला कर स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागेल.

कोणत्या भेटवस्तूंवर कर नाही

जर ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू मिळाल्या तर ते ‘इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न’मानले जाते. जर ही रक्कम २५,००० आणि १८,००० रुपये असेल, तर संपूर्ण वर्षभरात मिळालेल्या भेटवस्तूंचे एकूण मूल्य ४३,००० रुपये होईल. अशा परिस्थितीत तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. दरम्यान, भेटवस्तूंवरील कर दायित्व देखील भेटवस्तू कोण देत आहे यावर अवलंबून असते.

जर तुम्हाला नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाली आणि त्याची रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तरीही नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूवर कोणताही कर नाही. तसेच नातेवाईकांमध्ये जोडीदार, भाऊ किंवा बहीण, पालक, जोडीदाराचे पालक आणि इतरांचा समावेश होतो.

नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तू

आयकर कायद्यानुसार (आयटीए) नातेवाईकांकडून दिवाळी भेटवस्तूंना पूर्णपणे सूट देण्यात आली आहे, असे कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु नातेवाईकाव्यतिरिक्त इतर व्यक्तीकडून मिळालेली ५०,००० रुपयांपेक्षा जास्तीची भेटवस्तू इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या मुख्य उत्पन्नाच्या अंतर्गत करपात्र असेल. नियमांनुसार व्यक्तीचा पती/पत्नी, व्यक्तीचा भाऊ किंवा बहीण, व्यक्तीचा पती/पत्नीचा भाऊ किंवा बहीण, व्यक्तीचा भाऊ किंवा बहीण, व्यक्तीचा कोणीही वंशज, जोडीदार, वंशज इत्यादींचा यात समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने