National Education Day 2023: असा सुरु झाला राष्ट्रीय शिक्षण दिन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना समर्पित आहे.

देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा ११ नोव्हेंबर हा जयंती दिन आहे. आझाद हे स्वातंत्र्यसैनिक आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री (1947 ते 1958) होते. आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले होते.

राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्याचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे लोकांना शिक्षणाचा अधिकार आणि शिक्षणाचे महत्त्व याची जाणीव करून देणे. दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
या दिवशी विद्यार्थी आणि शिक्षक साक्षरतेचे महत्त्व आणि शिक्षणाच्या विविध पैलूंबद्दल त्यांचे विचार मांडतात. अनेक प्रकारचे सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. विविध शाळांमध्ये निबंध, भाषण, पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित केल्या जातात.

राष्ट्रीय शिक्षण दिन कधी सुरू झाला?

11 सप्टेंबर 2008 रोजी केंद्र सरकारने देशाचे महान स्वातंत्र्यसेनानी आणि प्रख्यात शिक्षणतज्ञ मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज म्हणजे 11 नोव्हेंबर रोजी जयंती आहे. दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.

हा आहे इतिहास

देशाच्या शिक्षण क्षेत्रात मौलाना अबुल कलाम आझाद यांचे मोठे योगदान आहे. 11 सप्टेंबर 2008 पासून देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती दिनी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.

1951 मध्ये देशाच्या शिक्षण मंत्रालयाने मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिली IIT स्थापन केली. यानंतर 1953 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) स्थापन करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) आणि माध्यमिक शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली.

यावेळची थीम काय आहे?

दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिनाची थीम शिक्षण मंत्रालयाकडून निश्चित केली जाते. या वर्षीची थीम Embracing Innovation आहे. 2022 ची थीम Changing Course, Transforming Education होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने