IPL 2024 चा लिलाव पहिल्यांदाच भारताबाहेर होणार, जाणून घ्या ऑक्शनची वेळ आणि LIVE स्ट्रीमिंग डिटेल्स

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या २०२४ हंगामासाठी मंगळवारी १९ डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला एरिना येथे लिलाव होणार आहे. यामध्ये एकूण ३३३ खेळाडूंचा लिलाव होणार आहे, तर संघांना ७७ स्लॉट आहेत, त्यापैकी ३० विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. २३ खेळाडूंनी २ कोटी रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे, तर १३ खेळाडूंची नोंदणी १.५ कोटी रुपयांच्या स्लॉटमध्ये करण्यात आली आहे. ३३३ खेळाडूंपैकी २१४ भारतीय आणि ११९ विदेशी खेळाडू आहेत, ज्यात दोन सहयोगी देशांचा समावेश आहे.

आयपीएलचा लिलाव भारताबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरात टायटन्स ३८.१५ कोटी रुपयांच्या सर्वाधिक पर्ससह लिलावात प्रवेश करेल, तर राजस्थान रॉयल्सकडे सर्वात कमी १४.५ कोटी रुपयांची पर्स आहे. एका ट्रे़डमुळे हार्दिक पांड्याचे गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये गेल्याची चर्चा खूप होती. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन्सने रोहित शर्माच्या जागी पंड्याला आयपीएल २०२४ साठी त्यांचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले आहे.
आयपीएल २०२४ चा लिलाव किती वाजता सुरू होणार?

IPL २०२४ लिलाव स्थानिक वेळेनुसार (दुबई) सकाळी ११:३० वाजता, म्हणजेच भारतात दुपारी १ वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स हे IPL २०२४ लिलावाचे अधिकृत प्रसारक आहे. दर्शक स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स २ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ एचडी हिंदी, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ तमिळ, स्टार स्पोर्ट्स १ एचडी तमिळ, तुम्ही स्टार स्पोर्ट्स १ तेलुगु, स्टार स्पोर्ट्स १ एचडी तेलुगु आणि स्टार स्पोर्ट्स १ कन्नड वर लिलावाचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. IPL २०२४ लिलावाचे लाइव्ह स्ट्रीमिंग JioCinema अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

आयपीएलमधील १० संघांकडे एकूण २६९.९५ कोटी रुपये आहेत.या लिलावात सर्वाधिक पैसा गुजरात टायटन्सकडे आहे. हार्दिक पांड्या बाहेर पडल्यानंतर फ्रँचायझीने शुभमन गिलला संघाचा कर्णधार बनवले आहे. हा संघ ३८.१५ कोटी रुपयांसह लिलावात उतरणार आहे. यानंतर सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक पैसा आहे. हैदराबादचा संघ ३४ कोटी रुपये घेऊन प्रवेश करेल. चेन्नई सुपर किंग्ज ३१.४ कोटी रुपयांची पर्स मनी घेऊन उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडे २८.९५ कोटी रुपये आहेत. कोलकातामध्ये ३२.७ कोटी रुपये आहेत. सर्वात कमी पैसा केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सकडे आहे. या संघाकडे १३.१५ कोटी रुपये आहेत. मुंबई इंडियन्सकडे १७.७५ कोटी रुपये आहेत. पंजाब किंग्स २९.१ कोटी रुपयांसह लिलावात जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २३.२५ कोटी रुपयांना लिलावात बसणार आहे. राजस्थान रॉयल्सकडे फक्त १४.५ कोटी रुपये आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने