विविध प्रकारचे फिचर्स आणि दमदार क्वालिटीसाठी ‘या’ स्मार्टवॉचेसची करा निवड

तरूणाईमध्ये स्मार्टवॉच चांगलेच लोकप्रिय आहे. तरूणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना स्मार्टवॉचने वेड लावले आहे. खास करून तरूण वर्गात स्मार्टवॉचची क्रेझ पहायला मिळते.

खरे तर तरूणाईच्या गरजा लक्षात घेऊनच हे स्मार्टवॉच बाजारात आणण्यात आले होते. त्यानंतर, हळूहळू या स्मार्टवॉचने तरूणाईच्या मनात खास स्थान निर्माण केले. यातील आकर्षक फिचर्स आणि वैविधत्येमुळे हे स्मार्टवॉच आता प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टवॉचेस बद्दल सांगणार आहोत, जे २५ हजारांपेक्षा ही कमी बजेटमध्ये सहज उपलब्ध आहेत. कोणते आहेत हे स्मार्टवॉचेस ? चला तर मग जाणून घेऊयात.
Amazfit T-Rex

जर तुम्ही चांगल्या तगड्या स्मार्टवॉचच्या शोधात असाल तर हे अमेजफिट टी-रेक्स तुमच्यासाठी बेस्ट आहे. या स्मार्टवॉचमध्ये zep ऑपरेटिंग सिस्टिम उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचने Adventure प्रेमींमध्ये खास स्थान निर्माण केले आहे.

कारण, कोणत्याही कठिण परिस्थितीमध्ये हे स्मार्टवॉच चांगले काम करू शकते. कठिण परिस्थितीमध्ये हे स्मार्टवॉच चांगले काम करते, त्यामुळे ट्रेकिंग करताना किंवा साहसी खेळ खेळताना देखील तुम्ही या वॉचचा बिनधास्त वापर करू शकता.

या स्मार्टवॉचमध्ये 1.39 इंच HD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. शिवाय, या स्मार्टवॉचची अनेक प्रकारच्या मिलिटरी स्टॅंडर्ड टेस्टमधून चाचणी करण्यात आली आहे.

फिटबिट वर्सा 2

या बेस्ट स्मार्टवॉचच्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर फिटबिट वर्सा २ हे स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉचमध्ये विविध प्रकारची आकर्षक फिचर्स दिसून येतात. या स्मार्टवॉचमध्ये Amazon अलेक्साच्या फिचर्सचा ही समावेश आहे. त्यामुळे, हे स्मार्टवॉच इतर स्मार्टवॉचपेक्षा वेगळे ठरते.

या स्मार्टवॉचवर तुम्हाला बातम्या, हवामानाचे अपडेट्सह इतर प्रकारचे अपडेट्स ही मिळतील. या व्यतिरिक्त स्लीप ट्रॅकिंग, हर्टबीट्स आणि आरोग्याशी संबंधित माहिती देखील तुम्हाला या स्मार्टवॉचवर मिळेल.

विशेष म्हणजे हे स्मार्टवॉच तुमच्या फिटनेसवर २४ तास वॉच ठेवते आणि सतत सूचनांद्वारे तुम्हाला आठवण करून देते. या वॉचची बॅटरी लाईफ ६ दिवस आहे, ज्यामुळे, हे स्मार्टवॉच तुम्ही दीर्घकाळ वापरू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने