कुर्तीवर स्टायलिश दिसायचे आहे? मग, 'या' सिंपल हेअरस्टाईल्सची घ्या मदत

तुमचा लूक आकर्षक आणि सुंदर दिसावा यासाठी तुम्ही योग्य आऊटफीटची निवड करता. मग, त्यावर सुंदर मेकअप आणि ज्वेलरी कॅरी करता, जेणेकरून तुमचा लूक पूर्ण होऊ शकेल. मात्र, यासोबतच तुमची हेअरस्टाईल देखील तितकीच महत्वाची आहे.

आऊटफीट सुंदर असेल त्यावर मेकअप आणि ज्वेलरी छान असेल आणि हेअरस्टाईल जर उठून दिसणारी नसेल तर मग तुमचा लूक खराब दिसू शकतो. त्यामुळे, हेअरस्टाईल फार महत्वाची आहे.

आजकाल कुर्तीची महिलांमध्ये खूप क्रेझ आहे. या कुर्तीवर सुंदर हेअरस्टाईल केल्यावर तुमच्या लूकला आकर्षक लूक मिळू शकेल यात काही शंका नाही. आज आपण अशाच सिंपल आणि सुंदर हेअरस्टाईल्सबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या शॉर्ट आणि लॉंग कुर्तीवर एकदम उठून दिसतील.
साईड हेअर ब्रीड्स

जर तुम्ही कुर्तीवर काही वेगळी हेअरस्टाईल करण्याचा विचार करत असाल तर ही साईड हेअर ब्रीड्स हेअरस्टाईल एकदम परफेक्ट आहे. कुर्तीवर ही हेअरस्टाईल एकदम उठून दिसते.

ही हेअरस्टाईल बनवायला ही एकदम सोपी आणि सिंपल आहे. तुम्ही एकट्या असाल तरी सुद्धा तुम्ही ही हेअरस्टाईल एकदम सहज करू शकता.

साईड हेअर ब्रीड्स ही हेअरस्टाईल अशा पद्धतीने करा

 • सर्वात आधी तुमच्या केसांचे दोन भाग करा.
 • यानंतर, एका बाजूने केसांची वेणी अर्थात ब्रीड्स घालायला सुरूवात करा.
 • त्यानंतर, दुसऱ्या बाजूने केसांमध्ये ब्रीड्स घाला.
 • जेव्हा दोन्ही बाजूंनी केसांचे ब्रीड्स तयार होतील तेव्हा ते पिंन्सच्या मदतीने सेट करा.
 • यानंतर, कर्लरच्या मदतीने तुमचे खालील केस कर्ल करून घ्या.
 • अशाप्रकारे तुमच्या केसांची साईड हेअर ब्रीड्स हेअरस्टाईल तयार आहे.

फ्रंट पफ हेअरस्टाईल

आजकाल ही हेअरस्टाईल खूपच ट्रेंडिगमध्ये आहे. तरूणींमध्ये आणि महिलांमध्ये तर या हेअरस्टाईलची खास क्रेझ पहायला मिळतेयं.

ही हेअरस्टाईल शॉर्ट कुर्तीवर आणि डिझायनर सूट किंवा ड्रेसवर ही एकदम उठून दिसते. या हेअरस्टाईलमुळे तुमच्या कुर्तीला आणि ड्रेसला छान क्लासी लूक मिळतो.

फ्रंट पफ हेअरस्टाईल करण्याची योग्य पद्धत

 • ही हेअरस्टाईल करण्यासाठी सर्वात आधी तुमचे केस चांगल्या प्रकारे विंचरून घ्या.
 • त्यानंतर, पफ करताना जसे तुम्ही कपाळाच्या वरचे केस घेता तसे घ्या.
 • आता या केसांचा छान पफ तयार करा आणि हेअर पिंन्सच्या मदतीने हा पफ सेट करा.
 • आता पोनीटेलसाठी तुमचे सर्व केस एकत्र करा आणि त्यांना हेअरबॅंड लावा.
 • तुमची फ्रंट पफ हेअरस्टाईल तयार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने