गुगल आणत आहे अप्रतिम फीचर, आता तुम्ही हाईड करू शकणार तुमचे सिक्रेट फोटो आणि व्हिडिओ

गुगलच्या अँड्रॉइड ओएसची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही. आता गुगल एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्याच्या मदतीने मोबाईल यूजर्स त्यांचे अॅप्स सहज हाईड करू शकतील. अनेक वापरकर्ते त्यांच्या प्रायव्हसीसाठी मेसेजिंग अॅप्स किंवा इतर अॅप्सला हाईड करतात . त्यासाठी तो वेगवेगळ्या ट्रिक्स आणि प्रोसेसही फॉलो करतात.

गुगलने एक नवीन फीचर डेव्हलप करण्यास सुरुवात केली आहे. याचे नाव प्रायव्हेट स्पेस असून ते फोनमधील अँड्रॉइड अॅप्स हाईड करण्याचे काम करेल. स्टॉक अँड्रॉइड यूजर्सना हे फीचर्स मिळणार आहेत.
स्टॉक अँड्रॉइड

स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव अनेकांना आवडतो, कारण तो अगदी सोप्या इंटरफेसमध्ये येतो. यात गुगल अॅप्सशिवाय ब्लोटवेअर उपलब्ध नाही. यामुळे स्टॉक अँड्रॉइड वापरकर्ते इतर Android स्किनमध्ये उपलब्ध असलेली अनेक फीचर्स मिळवू शकत नाहीत.

अँड्रॉइड स्किनमध्ये, वापरकर्त्यांना अॅप्स हाईड करण्याचे फीचर मिळते, परंतु स्टॉक अँड्रॉइड अॅप्समध्ये हे वैशिष्ट्य उपलब्ध नाही. पण आता स्टॉक अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि लवकरच त्यांना प्रायव्हेट स्पेस नावाचे फीचर मिळेल, जे त्यांना अॅप्स हाईड करण्याची परवानगी देईल.

Private Space फीचर सध्या बीटा आवृत्तीमध्ये आहे

हे Private Space फीचर सध्या बीटा टेस्टिंगमध्ये आहे. हे फीचर प्रथम न्यू सेटिंग्ज पेजवर पाहिले गेले आहे, जे Android 14 QPR2 बीटा 1 मध्ये आहे. ही आवृत्ती गेल्या महिन्यात लॉन्च करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती मिळाली आहे. एका रिपोर्टनुसार, हे फीचर Settings > Security & Privacy > Private Space मध्ये जाऊन ऍक्सेस केले जाऊ शकते.

एकदा Private Space इनेबल केल्यानंतर, वापरकर्ते त्यांचे अॅप्स सहजपणे हाईड आणि सिक्योर करू शकतात. अॅप्स लिस्टच्या तळाशी जाऊन तुम्ही ते एक्सेस करू शकता. सर्व Private Space अॅप्स लॉकद्वारे संरक्षित केले जातील.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने