नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करायचे आहे? मग, दक्षिण भारतातील 'या' हिलस्टेशन्सची करा निवड

भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती आणि इतिहास आहे. यासोबतच देशातील अनेक राज्यांमध्ये निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य पहायला मिळते.

दक्षिण भारत हा आपल्या देशातील असाच एक विलोभनीय भाग आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य जगभरात प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये अशी अनेक अद्भूत ठिकाणे तुम्हाला पहायला मिळतात.

दक्षिण भारत जसा तेथील समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसाच, तो तेथील काही प्रेक्षणीय आणि आकर्षक हिल स्टेशन्ससाठी प्रसिद्ध आहे. आज आपण दक्षिण भारतातील काही नयनरम्य हिलस्टेशन्सबद्दल जाणून घेणार आहोत. जिथे तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नक्कीच जाऊ शकता.
वागामों हिल स्टेशन

केरळमधील सुप्रसिद्ध ठिकाण म्हणून वागामो प्रसिद्ध आहे. हे हिलस्टेशन समुद्रसपाटीपासून १ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर वसलेले आहे. हे अतिशय मनमोहक आणि नयनरम्य हिलस्टेशन आहे.

या परिसरातील उंच पर्वत, घनदाट जंगले, तलाव आणि धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे, देश-विदेशातील अनेक पर्यटकांची येथे मांदियाळी पहायला मिळते. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण नंदनवन आहे.

वायनाड

केरळमधील सुप्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुन्नार हिलस्टेशनला तर सगळे जण जातात. मात्र, जर तुम्हाला नवीन वर्षाचे स्वागत काही वेगळ्या अंदाजात करायचे असेल तर वायनाड हे हिलस्टेशन तुमच्यासाठी बेस्ट आहे.

वायनाडमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यासोबतच तुम्ही येथील चेंबरा पीक, वायनाड वन्यजीव अभयारण्य, कुरूव बेट, पूकोट तलाव आणि बाणासूर हिल्स यांसारखी अद्भूत आणि प्रसिद्ध ठिकाणे देखील तुम्ही एक्सप्लोअर करू शकता.

कूर्ग

कूर्ग हे कर्नाटक राज्यातील सर्वात प्रसिद्ध असे ठिकाण आहे. येथील नयनरम्य परिसर हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. जगभरातील अनेक पर्यटक या हिलस्टेशनला भेट देण्यासाठी दरवर्षी गर्दी करत असतात.

‘भारताचे स्कॉटलंड’ म्हणून ही या कूर्ग हिलस्टेशनची खास ओळख आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हे ठिकाण एकदम बेस्ट आहे. येथील कॉफीच्या बॅगा,एबी फॉल्स, केर लेक, नामड्रोलिंग मठ इत्यादी ठिकाणे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने