मासिक पाळीमध्ये वेदनाशामक औषधांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटात दुखणे आणि वेदना होणे अत्यंत सामान्य गोष्ट आहे. मासिक पाळी येणाऱ्या अर्ध्याहून अधिक महिलांना त्यांच्या पाळीदरम्यान सुमारे एक ते दोन दिवस वेदना होतात. हे ओटीपोटात दुखणे सामान्यतः पाळीच्या सुरुवातीला होतात. या ओटीपोटात दुखण्याच्या कारणाविषयी स्पष्टीकरण देताना, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. जागृती वार्ष्णेय यांनी सांगितले, “मासिक पाळीच्या वेळी जाड झालेला एंडोमेट्रियम (endometrium) म्हणजेच गर्भाशयाचे अस्तर निघून जाते. हे प्रोस्टॅग्लॅंडिन (prostaglandins) नावाच्या काही हॉर्मोन-सदृश(hormone-like) पदार्थांमुळे होते, जे गर्भाशयाच्या आकुंचन, वेदना आणि दाह होण्यामागे कारणीभूत ठरते आणि या लक्षणांमुळे मासिक पाळीत ओटीपोटात दुखते

याबाबत त्यांनी पुढे सांगितले की, “सामान्य पातळीच्या वेदना सामान्य असतात आणि प्रत्येक मासिक पाळीच्यावेळी महिलांना जाणवतात; पण लक्षणांची तीव्रता अधिक असल्यास, ते प्रोस्टॅग्लॅंडिनच्या (prostaglandins) उच्च पातळीमुळे असू शकते, ज्यामुळे फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस (endometriosis) किंवा ओव्हेरिअन सिस्ट (ovarian cyst) सारख्या समस्या होऊ शकतात.”
डॉ. वार्ष्णेय यांच्या म्हणण्यानुसार, “मासिक पाळीच्या वेदनांसाठी वेदनाशामक औषध (Pain Killer) वापरताना काय करावे आणि काय करू नये ते येथे दिले आहे.

ओटीपोटात दुखण्यासाठी वेदनाशामक औषध घेणे सामान्यतः सुरक्षित असते, परंतु जर तुम्हाला दैनंदिन कामे करता येत नसतील, तर तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधला पाहिजे. पण, सौम्य ते मध्यम वेदनांसाठी, तुम्ही नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAID) जसे की मेफेनॅमिक अॅसिड (mefenamic acid) आणि आयबुप्रोफेन वापरू शकता.

NSAIDs मासिक पाळीच्या ओटीपोटात दुखण्यासाठी कारणीभूत जबाबदार असलेल्या स्टॅग्लॅंडिनचे (prostaglandins) उत्पादन रोखण्यास मदत करतात. पण, त्याचा एक विशिष्ट प्रमाणात डोस घेतला पाहिजे. ibuprofen साठी आदर्श डोस २०० mg आहे, तर मेफेनॅमिक अॅसिडसाठी २५० mg आहे. आठ तासांच्या कालावधीत फक्त एक ते दोन गोळ्या घेतल्या जाऊ शकतात.

तज्ज्ञ सल्ला देतात की, “या NSAIDs गोळ्यांचे सेवन फक्त पूर्ण जेवणानंतरच केले पाहिजे, कारण ते गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या निर्माण करू शकतात. निश्चित प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त वापरामुळे मळमळ आणि उलट्या वाढू शकतात, कारण प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (Premenstrual syndrome) ग्रस्त महिलांमध्ये ही लक्षणे आधीच अस्तित्वात आहेत. यामुळे बद्धकोष्ठता, छातीत जळजळ, उच्च रक्तदाब आणि पोटदुखीदेखील होऊ शकते. NSAIDs च्या अतिवापराशी संबंधित माहीत नसलेले धोके म्हणजे पोटात अल्सर किंवा रक्तस्त्राव, मूत्रपिंड आणि हृदय समस्या इ.

वेदनाशामक औषधांची जागा घेऊ शकणारे नैसर्गिक उपाय आहेत:

  • हायड्रेटेड राहा.
  • ब्लोटिंग किंवा पोट फुगण्यासारख्या समस्या होईल असा आहार टाळा.
  • टोमॅटो, बेरी, अननस, आले, हिरव्या पालेभाज्या, बदाम आणि अक्रोड यांसारखे दाहक-विरोधी अन्न खा.
  • आहारातील पूरक आहार (supplements) जसे की, व्हिटॅमिन डी, ई आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्.
  • पोटाच्या खालच्या (abdominal area) भागात गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्या.
  • व्यायामामुळे आपल्या शरीरात एंडोर्फिन सोडतात, ज्यामुळे स्नायू शिथिल होतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने