शेअर बाजारात मोदी मॅजिक इफेक्ट; निवडणूक निकालानंतर मार्केटचा ‘जोश हाय’, गुंतवणूकदारांचा उत्‍साह दुणावला

सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. रविवारी चार राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांचा परिणाम आज बाजारात दिसून येत आहे. मार्केटच्या सुरुवातीच्या सत्रात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३० शेअर्सच्या सेन्सेक्स सेन्सेक्सने प्रथमच ६८ हजारांची पातळी ओलांडली आणि निर्देशांकाने ९५४ अंकांपेक्षा जास्त उसळी घेतली तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३३४ अंक उडी घेतेय व्यवहार करत आहे. आज शेअर बाजारात विक्रमी तेजी पाहायला मिळत असून सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांक नोंदवला.
शेअर बाजारात विक्रमी तेजी

बीएसई सेन्सेक्स सुमारे ९०० अंकांनी मुसंडी मारून ६८,४३५ अंकांवर उघडला तर निफ्टीने पहिल्यांदा २०,६०१ अंकांवर उडी घेतली. लक्षात घ्या की सोमवारी शेअर बाजारात बंपर तेजीची शक्यता तज्ञ आधीच वर्तवत होते. तर आज प्री-ओपन सत्रात प्रमुख शेअर बाजार निर्देशांक निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर उघडला. बाजारात अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, एसबीआय आणि एल अँड टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये हिरवळ दिसत आहे.

दरम्यान, क्षेत्रीय निर्देशकांबद्दल बोलायचे तर फिन सर्व्हिस, सरकारी बँक, एफएमसीजी, आयटी, ऑटो, एनर्जी, इन्फ्रा यासह जवळपास सर्व प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करत असून इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार बाजार उघडल्यानंतर बीएसईचे मार्केट कॅप चार लाख कोटी रुपयांनी वाढून ३४१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

सेन्सेक्स आणि निफ्टीमधील गेनर्स-लुझर्स

दरम्यान, मारुती सुझुकी वगळता सेन्सेक्स पॅकमधील इतर सर्व शेअर्समध्ये तेजी दिसत असून L&T, ICICI बँक, M&M, NTPC, एसबीआय आणि भारती एअरटेल सर्वाधिक लाभधारक ठरले. त्याच वेळी, निफ्टीमधील ५० पैकी ४४ समभाग तेजीने धावत आहेत. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट, कोल इंडिया, ICICI बँक, L&T, NTPC, एसबीआय, M&M, BPCL, ONGC आणि भारती एअरटेल हे आघाडीवर असून ब्रिटानिया, मारुती सुझुकी, एचडीएफसी लाइफ, टीसीएस, एसबीआय लाइफ आणि एचसीएल टेक या कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने