यूट्यूबवर यावर्षी पाहिले गेलेले 'टॉप 10' व्हिडिओ; 'बेबी शार्क' कितव्या क्रमांकावर?

जगातील सर्वात मोठं व्हिडिओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या यूट्यूबचा वापर जवळपास सगळेच करतात. कोणत्याही विषयावर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून पाहण्याची सुविधा यामुळे मिळते. 'ब्रॉडकास्ट युवरसेल्फ' या टॅगलाईनसह लाँच झालेल्या यूट्यूबचे यूजर्स इन्स्टाग्राम, टिकटॉक, एक्स, याच्या तुलनेत कितीतरी पटींनी अधिक आहेत.

गेल्या काही वर्षांपासून वर्षाच्या शेवटी त्या-त्या वर्षी सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओंची यादी प्रसिद्ध केली जाते. फोर्ब्सने यावर्षी देखील अशी एक यादी प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी टॉपला असलेला 'बेबी शार्क' या व्हिडिओने यंदाही बाजी मारली आहे.
10. Learning Colors - Colourful Eggs on a Farm

लहान मुलांसाठी असलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 5 बिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. Miroshka TV या चॅनलने हा व्हिडिओ 2018 साली अपलोड केला होता. यावर्षी हा व्हिडिओ व्हूअरशिपमध्ये दहाव्या क्रमांकावर राहिला.

9. Uptown Funk

Mark Ranson या चॅनलवरुन अपलोड करण्यात आलेलं हे गाणं यावर्षी नवव्या क्रमांकावर राहिलं. या गाण्याला आतापर्यंत 5.05 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

8. Phonics Song with Two Words

लहान मुलांसाठी असणाऱ्या या व्हिडिओला 5.52 बिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ChuChu TV Nursery Rhymes & Kids Songs या भारतीय चॅनलने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. यावर्षी हा आठव्या क्रमांकावर राहिला.

7. Wheels on The Bus

अमेरिकेतील Nursery Rhymes या चॅनलने अपलोड केलेलं हे लहान मुलांसाठीचं बडबडगीत यावर्षी सातव्या क्रमांकावर राहिलं. या व्हिडिओला आतापर्यंत 5.62 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

6. See You Again

फास्ट अँड फ्युरिअस सीरीजमधील हे गाणं यावर्षी देखील लोकप्रिय गाण्यांमध्ये राहिलं. 2015 साली अपलोड करण्यात आलेल्या या गाण्याला आतापर्यंत 6.05 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

5. Shape of You

एड शिरीन या गायकाचं शेप ऑफ यू हे गाणं यावर्षीही लोकप्रिय ठरलं. या गाण्याला आतापर्यंत 6.11 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

4. Bath Song

Cocomelon - Nursery Rhymes या चॅनलने अपलोड केलेल्या बाथ साँग या गाण्याला आतापर्यंत 6.45 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

3. Johny Johny Yes Papa

LooLoo Kids या चॅनलने अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 6.82 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

2. Despacito

Luis Fonsi च्या या स्पॅनिश गाण्याला आतापर्यंत तब्बल 8.28 बिलियन व्हूज मिळाले आहेत. 2017 साली रिलीज झालेलं हे गाणं अजूनही लोकप्रियतेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

1. Baby Shark Dance

Pinkfong Baby Shark या चॅनलने अपलोड केलेल्या बेबी शार्क या लहान मुलांच्या गाण्याला आतापर्यंत तब्बल 13.48 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने