टाटा, अदानी, रिलायन्स नव्हे या शेअर्समुळे मालामाल झाले गुंतवणूकदार, वर्षभरात केली बक्कळ कमाई

भारतीय शेअर बाजारासाठी वर्ष २०२३ ऐतिहासिक ठरले आहे. यावर्षी हिंडेनबर्गच्या अहवालामुळे सातत्याने पडझड झाली आणि प्रचंड प्रमाणात चढउतार झाले, तर वर्षाच्या शेवटी आता मार्केटच्या दोन्ही निर्देशांकांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला. दरम्यान, बाजाराच्या चढउतारात टाटा समूह, अदानी, रिलायन्स किंवा बिर्ला समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सनी नाही तर सरकारी क्षेत्रातील कंपन्या - ऊर्जा क्षेत्रातील शेअर्स असोत किंवा संरक्षण किंवा सरकारी क्षेत्रातील बँकिंग स्टॉक्स भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठ्या मल्टीबॅगर्स ठरले.

निफ्टी पीएसई निर्देशांक ७४% वधारला

गेल्या वर्षी २०२२ च्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी PSE निर्देशांक ४,३६७ अंकांवर बंद झाला यावरून सरकारी कंपन्यांच्या शेअरमधील तेजीचा अंदाज लावला जाऊ शकतो जो १४ डिसेंबर २०२३ रोजी ७,५४८ अंकांवर बंद झाला. तर २०२३ मध्ये निर्देशांकात सुमारे ७३% तेजी राहिली तर करोना काळापासून तीन वर्षांत निर्देशांकाने १६० टक्क्यांनी उसळी घेतली आहे.
पॉवर स्टॉक्सनी दिला १८५ ते २८०% परतावा

यावर्षात सर्वोत्तम शेअर्सच्या बाबतीत बोलायचे तर ऊर्जा क्षेत्रातील REC स्टॉक सरकारी क्षेत्रातील कंपन्यांमधील सर्वात मोठा मल्टीबॅगर ठरला आहे. REC स्टॉकने २०२३ मध्ये २८० टक्क्यांनी मुसंडी मारली तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा स्टॉकही आरईसीच्या पावलावर पाऊल ठेवून यावर्षी गुंतवणूकदारांना २७५ टक्के परतावा दिला आहे.

याशिवाय हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर उत्पादने बनवणाऱ्या SJVN स्टॉकने देखील मल्टीबॅगर परतवा दिला आणि यावर्षी गुंतवणूकदारांना १८५% परतावा दिला. तसेच वर्षाच्या शेवटी बाजारात प्रवेश केलेली IREDA एकमेव सरकारी कंपनी होती जी IPO घेऊन आली होती. कंपनीचे शेअर्स २९ नोव्हेंबर रोजी स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध झाले आणि केवळ १३ दिवसांच्या सत्रात शेअरने २७५% परतावा नोंदवला.

मल्टीबॅगर डिफेन्स स्टॉक्स

दुसरीकडे संरक्षण क्षेत्रातील माझगाव डॉकच्या स्टॉकनेही १६२ टक्के मल्टीबॅगर परतावा दिला असून गेल्या तीन वर्षांत याच शेअरने सुमारे १९ पट वाढून ९७० टक्के परतावा नोंदवला. तसेच HAL ने देखील आणखी एक मल्टीबॅगर डिफेन्स स्टॉक आहे ज्याने गुंतवणूकदारांचे खिसे भरून काढले. ३० डिसेंबर रोजी शेअर २,५३१ रुपयांवर बंद झाला आणि त्या स्तरावरून स्टॉकने यावर्षी १२० टक्के परतावा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने