हवामान बदलामुळे निर्माण झाली स्थिती चिंताजनक; भारताला बसला मोठा फटका

हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक स्थितीचा भारताला मोठा फटका बसला असून २०११-२०२० या दशकात अतिवृष्टी, अतिउष्णता अनुभवण्यास मिळाली, असे निरीक्षण जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या हवामानासंबंधी परिषदेत मंगळवारी हा अहवाल जाहीर करण्यात आला. ‘हवामानाची दशकभरातील स्थिती २०११-२०२०’ या अहवालात आणखी अनेक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच, गेल्या आठवड्यामध्ये हवामान बदल परिषदेत सन २०२३चा हंगामी वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यानुसार २०२३ हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरेल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला.
जगभरातील परिणाम

- या दशकात हवामान बदल चिंताजनक. हे दशक सर्वाधिक उष्ण

- वायव्य भारत, पाकिस्तान, चीन आणि अरबी द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर हे सर्वाधिक पावसाचे दशक

- २०११-२०२० कालावधीत अतिउष्ण दिवसांशी संबंधित घटनाक्रम आग्नेय आशियातील काही भाग, बहुतांश युरोप, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको आणि पूर्व ऑस्ट्रेलियाच्या काही भागांमध्ये १९६१-१९९०च्या सरासरीच्या अंदाजे दुप्पट

- जागतिक तापमान वाढल्याने अत्यंत थंडीचे प्रमाण कमी

- २०११-२०२० या कालावधीत अत्यंत थंडीचे दिवस आणि रात्री १९६१-१९९०च्या सरासरीपेक्षा सुमारे ४० टक्के कमी

भारतात काय घडले?

- भारतात जून २०१३मध्ये मान्सूनकाळात सर्वांत भीषण पूर

- केरळला २०१८मध्ये पुरांचा तीव्र फटका

- २०१९ आणि २०२०मध्ये गेल्या २५ वर्षांतील भारताच्या दोन सर्वाधिक अतिवृष्टीच्या मान्सूनकाळात तीव्र आणि व्यापक पूर पाहायला मिळाला

- भारत आणि शेजारील देशांत पुरामुळे दोन हजारांहून अधिक जणांच्या मृत्यूंची नोंद

-२०११-२०२० या दशकात कोरड्या दुष्काळाचा सामाजिक-आर्थिक आणि मानवतावादी परिणाम

- भारतात २८पैकी ११ राज्यांत कोरडा दुष्काळ घोषित

- यामुळे अन्न आणि पाण्याची तीव्र असुरक्षितता निर्माण झाली

- पाण्याची उपलब्धता, तसेच त्याचा पुरवठा यामधील असमानतेमुळे स्थिती आणखी बिकट

डब्ल्यूएमओ काय आहे?

- डब्ल्यूएमओ ही संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था

- या संस्थेचे हवामान, वातावरण, जलस्रोत या विषयांवर काम

- डब्ल्यूएमओकडून दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या हवामान स्थितीशी संबंधित अहवालांच्या तुलनेत हा नवा अहवाल दीर्घकालीन दृष्टिकोन आणि शाश्वत कल देतो. यामुळे जग कुठे चालले आहे, हे ओळखण्यात मदत होऊ शकते, असे डब्ल्यूएमओचे उपमहासचिव एलेना मनाएंकोव्हा सांगतात.

हवामान बदलाचा ‘अति’फटका

- हवामान संघटनेच्या अहवालातील निष्कर्ष

- दशकभरात अतिवृष्टी, अतिउष्णतेचा अनुभव

- २०२३ सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याचा अंदाज

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने