नवीन वर्षात घरी बसून करा ‘हे’ कोर्स आणि वाढवा तुमचे उत्पन्न

करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य शिक्षण घेतले जाते. हे शिक्षण घेत असताना त्यासोबत अनेक प्रकारचे कोर्सेस केले जातात. जेणेकरून आपले स्किल्स वाढतील आणि याचा करिअरमध्ये नक्की फायदा होतो. हे आपल्याला मान्य करावेच लागेल.

कोरोना महामारी आल्यानंतर 'वर्क फ्रॉम होम' असणाऱ्या जॉब्सला प्राधान्य देण्यात आले. यासोबतच अनेक वर्क फ्रॉम होमचे जॉब देखील निर्माण झाले. त्यामुळे, याकडे तरूणाईचा कल वाढताना दिसला.

आता काही दिवसांनी आपण सर्वजण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. या नव्या वर्षात घरी बसून तुम्ही काही भन्नाट कोर्सेसची मदत घेऊ शकता. हे कोर्सेस केल्यानंतर तुमचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि करिअरमध्ये ही ग्रोथ होईल. कोणते आहेत हे कोर्सेस? चला तर मग जाणून घेऊयात.
सोशल मीडिया मार्केटिंग

कोरोना महामारी दरम्यान सोशल मीडिया मार्केटिंग या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. हा विस्तार झाल्यामुळे, या क्षेत्रात रोजगाराच्या संधी देखील निर्माण झाल्या आहेत.

जर तुमचा व्यवसायाकडे कल असेल किंवा तुमच्याकडे कंपनी चालवण्याची क्षमता असेल तर, सोशल मीडिया मार्केटिंगचा कोर्स तुमच्यासाठी उत्तम आहे. आजकाल सोशल मीडियाचा वापर हा व्यवसायाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

सोशल मीडियावर आपल्या उत्पादनांच्या जाहिराती करणे, त्याचे प्रमोशन करणे आणि तुमच्या व्यवसायाबद्दल लोकांना माहिती देणे या गोष्टी प्रामुख्याने केल्या जातात. थोडक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्यवसायाची ऑनलाईन जाहिरात करू शकता. त्यामुळे, हा कोर्स नक्की करा. हा कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील उपलब्ध आहे.

फोटोग्राफी

सोशल मीडियाचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोशल मीडियावर फोटो हमखास शेअर केले जातात. मग ते पर्सनल असो किंवा व्यावसायिक असो. अशा दोन्ही माध्यमांवर चांगल्या फोटोंना आणि चांगल्या फोटोग्राफर्सना मागणी आहे. त्यामुळे, फोटोग्राफीचा विस्तार आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

त्यामुळे, फोटोग्राफीच्या क्षेत्रात ही तुम्ही उत्तम करिअर करू शकता. फक्त तुम्हाला फोटो काढण्याची आवड हवी. आजकाल अनेक वेबसाईटवर ऑनलाईन फोटोग्राफीचे कोर्सेस सुरू झाले आहेत. त्यामुळे, हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही फ्रिलान्स म्हणून ही काम करू शकता किंवा जाहिरात एजन्सी, टेलिव्हिजन किंवा ट्रॅव्हल चॅनेलमध्ये ही काम करू शकता.

ग्राफिक डिझायनिंग

जर तुम्हाला स्केचिंग आणि डिझायनिंगची आवड असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी बेस्ट आहे. ग्राफिक डिझायनिंगला ही आजकाल खूप डिमांड वाढली आहे. तुम्ही फोटोशॉप आणि ग्राफिक डिझायनिंग सॉफ्टवेअरवर काम करू शकता.

हा कोर्स तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकता. अनेक वेबसाईट्स हा कोर्स ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करून देत आहेत. ग्राफिक डिझायनर या पोस्टला अनेक कंपन्यांमध्ये मागणी आहे. शिवाय, तुमचे उत्पन्न देखील वाढू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने