डायबिटीजसाठी हे 3 पदार्थ भयंकर विषारी, Ayurveda डॉक्टर म्हणतात फक्त या 10 गोष्टी Blood Sugar ठेऊ शकतात कंट्रोल

Diabetes हा एक गंभीर आणि वेगाने पसरणारा आजार आहे. भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, भारतात 18 वर्षांवरील तब्बल 77 दशलक्ष लोक मधुमेहाने (टाइप 2) ग्रस्त आहेत आणि सुमारे 25 दशलक्ष लोकांना प्री-डायबिटीज आहे म्हणजेच त्यांना नजीकच्या भविष्यात मधुमेहाचा धोका आहे. चिंतेची बाब अशी आहे की 50% पेक्षा जास्त लोकांना हे माहित नसते की त्यांना मधुमेह आहे आणि सर्वात मोठा धोका हा आहे की वेळेवर निदान आणि उपचार न केल्यास अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

पण हा मधुमेह टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत? तर मधुमेह टाळण्यासाठी किंवा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खाण्यापिण्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्या खरं तर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक आहेत.
दही

आयुर्वेदानुसार, दह्याची प्रकृती उष्ण आहे. हे पचायला जड आणि पातळ असते. हे शरीरात कफ दोष वाढवते (जेव्हा कफ वाढतो, तुमचे वजन वाढते, तुमची चयापचय अर्थात मेटाबॉलिज्म विस्कळीत होते आणि तुम्ही आळशी होतात). कफाच्या वाढीमुळे पौष्टिकतेची कमतरता आणि कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स देखील वाढू शकतात. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी दही टाळणेच उत्तम. दह्याऐवजी ताक (अधिक पाण्याने तयार केलेले) कधी कधी सेवन केले जाऊ शकते.

गुळ

आपल्या सर्वांना माहित आहे की, साखर टाळली पाहिजे, परंतु तुम्हाला माहित आहे का की साखरेपेक्षा गुळाचे समान किंवा जास्त प्रमाणात सेवन केल्याने साखर वाढू शकते. ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी तो एक अनहेल्दी ऑप्शन ठरू शकतो. पण हो हे सुद्धा खरे आहे की साखरेपेक्षा गूळ 100% आरोग्यदायी आहे कारण साखरेच्या विपरीत गूळ नैसर्गिक प्रक्रियेद्वारे केमिकल्सशिवाय तयार केला जातो आणि त्यात भरपूर पौष्टिकता असते. त्यामुळे गुळाचे सेवन जरूर करा, परंतु ते मर्यादित प्रमाणातच खा.

सफेद मीठ

मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते, ज्यामुळे हृदयविकार, पक्षाघात, किडनी रोग इत्यादींचा धोका वाढतो. मिठाच्या सेवनाने रक्तातील साखरेवर परिणाम होत नाही. पण मिठाच्या जागी रॉक सॉल्ट घेतल्याने तुम्हाला उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेहाशी संबंधित इतर समस्या टाळता किंवा नियंत्रित करता येतात.

डायबिटीजच्या रुग्णांनी काय खावे?

  1. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असून ते डायबिटीज नियंत्रित करते.
  2. मूग हे सर्वोत्तम आणि सहज पचण्याजोगे प्रोटीन आहे जे तुम्हाला ऊर्जा देते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते
  3. कढीपत्ता हर्बल चहामध्ये वापरला जाऊ शकतो किंवा आपल्या जेवणातील फोडणीत घातला जाऊ शकतो.
  4. बेलाची पाने व बेलपत्थर - दोन्ही चयापचय सुधारण्यास आणि साखर नियंत्रित करण्यास मदत करतात
  5. शेवग्याच्या शेंगा किंवा भाजी हे एक सुपर फूड आहे जे इंसुलिन रेसिस्टंस कमी करण्यास उपयुक्त आहे.
  6. नाश्त्यात खोबरे खाणे मधुमेह असलेल्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
  7. ऋतूनुसार फळे म्हणून बेरीज खाऊ शकता
  8. हळद प्रत्येक भाजीत घालता येते. उत्तम परिणामांसाठी आवळा मिसळूनही सेवन करू शकता.
  9. ज्वारी हा गव्हाला एक उत्तम पर्याय आहे कारण ते ग्लूटेन फ्री सुद्धा आहे.
  10. डाळिंब हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि गोड खाण्याची आवड असलेल्या लोकांसाठी खूप चांगले आहे.

या गोष्टींची घ्या काळजी

हे पदार्थ मधुमेहासाठी हानिकारक आहेत, याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते कधीही खाऊ शकत नाही. तुम्ही ते अधूनमधून मर्यादित प्रमाणात घेऊ शकता. या पदार्थांचा विशेषत: आयुर्वेदिक क्लासिक्समध्ये उल्लेख केला आहे आणि सांगितले आहे की हे पदार्थ मधुमेह किंवा इन्सुलिन रेसिस्टेंट असलेल्या लोकांनी टाळावे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने