भारत विरूध्द अफगाणिस्तान सामना नेमका किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ

अफगाणिस्तानचा संघ टी-२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. या उभय संघांमध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या आय एस बिंद्रा स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही देशांमधील ही पहिली द्विपक्षीय टी-२० मालिका असेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताचा अद्याप पराभव झालेला नाही. रोहित शर्माचा संघ मोठा दावेदार आहे पण अफगाणिस्तानकडे अपसेट करण्याची क्षमता आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू बऱ्याच काळानंतर टी-२० संघात परतले आहेत, त्यामुळे सर्वांच्या नजर या दोघांवर असतील.
पहिला टी-२० सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी, ११ जानेवारी रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. नाणेफेक सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच ६.३० वाजता होईल. सलामीवीर इब्राहिम झादरानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा संघ या मालिकेत मैदानात उतरणार आहे. राशीद खान हा टी-२० संघाचा कर्णधार आहे पण तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने झादरानकडे संघाचे नेतृत्त्व सोपवले आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्याचे स्पोर्ट्स 18 वाहिनीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. यासोबतच हा सामना जिओ सिनेमा अॅपवर स्ट्रीम केला जाईल. चाहते अॅपवर विनामूल्य सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. स्पोर्ट्स 18 कडे भारतात होणाऱ्या सर्व द्विपक्षीय मालिकांचे प्रसारण अधिकार आहेत.

हे आहेत दोन्ही संघ

भारत :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान :

इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमातुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब-उर रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि रशीद खान.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने