मधुमेही रुग्ण व गर्भवती महिला गव्हाचे सेवन करू शकतात का?

बहुतेक लोकांच्या आहारात गव्हाचा समावेश असतो. सकाळी नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खाल्ल्या जातात. गव्हाची खीर, पॅनकेक, गव्हापासून मसाला पुरी आदी बरेच पदार्थ बनवले जातात. पण, काही जणांना असे वाटते की, गव्हामध्ये ग्ल्यूटेन असते, त्यामुळे वजन वाढते. तर आज आपण याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. गव्हाचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असे द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सिग्नस लक्ष्मी हॉस्पिटल येथील जनरल फिजिशियन ‘डॉक्टर संजय कुमार’ यांनी सांगितले आहे.
गव्हाचे पौष्टिक फायदे :

कॅलरीज: ३३९ kcal प्रति १०० ग्रॅम

कर्बोदके : ७२.६ ग्रॅम

आहारातील फायबर: १२.२ ग्रॅम

साखर: ०.४१ ग्रॅम

प्रथिने: ११.३ ग्रॅम

फॅट (चरबी ): १.९ ग्रॅम

गव्हाचे आरोग्यदायी फायदे :

१. हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत : गव्हामध्ये फायबर असतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.

२. पचन सुधारते : गव्हातील उच्च फायबर सामग्री पचन सुलभ होण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतात.

३. वजन नियंत्रित ठेवते : गव्हातील फायबर वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

४. रक्तातील साखर नियंत्रित ठेवते : गव्हामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

५. अँटिऑक्सिडंट्स: गव्हात अँटिऑक्सिडंट असतात, जे संपूर्ण आरोग्यासाठी योगदान देतात आणि शरीरातील आजारांचा धोका कमी करू शकतात.

मधुमेही रुग्ण आहारात गव्हाचे सेवन करू शकतात का?

मधुमेह असणाऱ्या व्यक्ती त्यांच्या आहारात गव्हाचा समावेश करू शकतात. कारण गव्हातील फायबर सामग्री रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. पण, गव्हाचे आहारातील संतुलन महत्त्वाचे आहे.

गर्भवती महिलांसाठी गहू फायदेशीर आहे का?

गर्भवती महिलांसाठी आहारात गव्हाचा समावेश फायदेशीर ठरेल. कारण ते बाळाच्या विकासासाठी आवश्यक असलेले फॉलिक ॲसिड, लोह आणि बी जीवनसत्त्वे यांसारखे आवश्यक पोषक घटक प्रदान करतात.

आहारात गव्हाचा समावेश करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी :

१. काही व्यक्तींना गव्हाची ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे आहारात समावेश करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

२. गव्हामध्ये नैसर्गिक साखर असते.

३. गव्हाच्या अतिसेवनामुळे पोट फुगणे किंवा पचनास त्रास होऊ शकतो, त्यामुळे गव्हाचे सेवन करताना संयम ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मिथक आणि तथ्ये :

पहिला गैरसमज : गव्हामध्ये असणारे ग्लूटेन सेन्सेटिव्हिटी (sensitivity) निर्माण करू शकते?

गव्हामधील ग्लूटेन प्रोटीन पोटाच्या आतमध्ये प्रतिकूल क्रिया करत असते. पण, ही चिंतेची बाब नाही असे डॉक्टर म्हणतात.

दुसरा गैरसमज : गहू खाल्ल्याने वजन वाढते का ?

गहू संतुलित आहाराचा एक भाग आहे, त्यामुळे गव्हामुळे वजन वाढते असे कोणतेही कारण अद्यापही समोर आलेले नाही. त्यामुळे आहारात गव्हाचा समावेश करण्याचे हे आरोग्यदायी फायदे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने